तेलंगणा – ट्रकची ऑटोरिक्षाला धडक, लहान मुलासह ५ ठार

Bharat Live News Media ऑनलाईन : तेलंगणातील (Telangana) महबूबनगर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा येथील राष्ट्रीय महामार्ग ४४ वर झालेल्या अपघातात एका भरधाव ट्रकने ऑटोरिक्षा आणि मोटारसायकलला धडक दिली. यात एका लहान मुलासह ५ जणांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत.
महबूबनगर येथील बालानगर चौरस्ता येथे हा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ऑटोरिक्षात सहा प्रवासी होते, अशी माहिती महबूबनगर पोलिस अधीक्षकांनी दिली.
या घटनेनंतर या परिसरातील लोक संतप्त झाले आणि त्यांनी ट्रकला आग लावली. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
याआधी २५ डिसेंबर रोजी तेलंगणातील (Telangana) नलगोंडा जिल्ह्यात धुक्यामुळे एनएच १८६ वर झालेल्या दोन रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता, असे पोलिसांनी सांगितले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कमी दृश्यमानतेमुळे झालेल्या पहिल्या अपघातात वेंपहाड येथे एका पादचाऱ्यासह दोघांचा मृत्यू झाला होता.
Telangana | Five people died in a road accident in Balanagar Chowrasta in Mahabubnagar. A speeding lorry hit an autorickshaw that had six passengers onboard. Five people, including an infant, died on the spot: SP Mahabubnagar
— ANI (@ANI) January 6, 2024
हे ही वाचा :
fire broke out News : नागांव येथे ऑटो गॅरेजला शॉर्ट सर्किटने आग
कानाचे आजार वाढले; मात्र तज्ज्ञांची वानवा
Liberian ship hijack : अपहरण केलेल्या जहाजावरून सर्व भारतीय क्रू मेंबर्सची सुटका
Latest Marathi News तेलंगणा – ट्रकची ऑटोरिक्षाला धडक, लहान मुलासह ५ ठार Brought to You By : Bharat Live News Media.
