पंढरपूरला जाणारच; चप्पल फेकीचे स्वागतच : छगन भुजबळ

सांगली : मी उद्या पंढरपूरला जाणारच आहे आणि जर त्या ठिकाणी माझ्यावर कोण चप्पल फेकणार असेल, तर त्याचे मी स्वागतच करेन, असे मत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ते एका खासगी कार्यक्रमानिमित्त येथे आले होते, त्यावेळी माध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून मंत्री भुजबळ व मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते … The post पंढरपूरला जाणारच; चप्पल फेकीचे स्वागतच : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

पंढरपूरला जाणारच; चप्पल फेकीचे स्वागतच : छगन भुजबळ

सांगली : मी उद्या पंढरपूरला जाणारच आहे आणि जर त्या ठिकाणी माझ्यावर कोण चप्पल फेकणार असेल, तर त्याचे मी स्वागतच करेन, असे मत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
ते एका खासगी कार्यक्रमानिमित्त येथे आले होते, त्यावेळी माध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून मंत्री भुजबळ व मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. आज, पंढरपूरमध्ये ओबीसी मेळावा आहे. समाजाकडून पंढरपूरमध्ये उद्या त्यांना प्रसंगी चपलांचा हार घालण्याचा इशारा दिला आहे. त्यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाबाबत जरांगे यांच्या मुंबईला जाण्याच्या भूमिकेबाबत मंत्री भुजबळ म्हणाले, देशात लोकशाहीचे राज्य आहे. कोणी-कोठेही जावू शकतो.

Latest Marathi News पंढरपूरला जाणारच; चप्पल फेकीचे स्वागतच : छगन भुजबळ Brought to You By : Bharat Live News Media.