‘त्या’ विकसकावर गुन्हा दाखल करा : पालिकेचे पोलिसांना पत्र

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : आंबेगावमधील 11 बेकायदा इमारतींच्या बांधकामप्रकरणी येथील दहा विकसक संस्था, मालक व संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र महापालिकेच्या बांधकाम विभागाने भारती विद्यापीठ पोलिसांना दिले आहे.
आंबेगावमधील स. नं. 10 मधील अथर्व डेव्हलपर्स व इतर, साई गणेश डेव्हलपर्स व इतर, श्रावणी डेव्हलपर्स व इतर, आर. एल. चोरगे व इतर, श्री डेव्हलपर्स व इतर, साईनाथ डेव्हलपर्स व इतर, समर्थ डेव्हलपर्स व इतर, गवळी व इतर, मौर्य डेव्हलपर्स व इतर, गुरुदत्त डेव्हलपर्स, गुरुदत्त डेव्हलपर्स, आदींच्या 11 बेकायदा इमारतींचे बांधकाम महापालिकेने 28 डिसेंबर रोजी पाडून टाकले.
या कारवाईत सुमारे 44 हजार चौ. फूट बांधकाम पाडण्यात आले आहे. दरम्यान, या विकसक बिल्डरांना 20 डिसेंबरला चोवीस तासांत अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत तसेच स्वत:हून बांधकाम काढून घेण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या. संबंधितांविरोधात एमआरटीपी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा, असे पत्र महापालिकेच्या बांधकाम विकास झोन क्र. 2 चे कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना दिले आहे.
हेही वाचा
पणजी : रहिवासी इमारतीत पॅरामेडिकल सुविधा बंधनकारक
जयसिंगपूर : ‘त्या’ नकाशामुळे 10 गावांत खळबळ
T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर
Latest Marathi News ‘त्या’ विकसकावर गुन्हा दाखल करा : पालिकेचे पोलिसांना पत्र Brought to You By : Bharat Live News Media.
