दानवेंच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात ठाकरे-फडणवीसांनी समोरासमोर येण्याचे टाळले

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलांच्या लग्नसोहळ्यासाठी राज्यातील महायुती व महविकास आघाडीच्या नेत्यांनी हजेरी लावली. या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सत्ताधारी व विरोधक यांच्यात समोरासमोर भेटीची नामी संधी मिळाली होती. परंतु त्यांनी समोरासमोर येण्यास टाळले.
दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेमध्ये फूट पाडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अद्यापही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले नाहीत. या लग्न सोहळ्याला सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते हजेरी लावणार असल्याने राजकीय गोटात मोठी उत्सुकता होती. परंतु, लग्न समारंभामध्ये सत्ताधारी भाजप, शिंदे गट व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लग्नात एकत्र येण्यास टाळले.
उद्धव ठाकरे गेल्यानंतर फडणवीस आले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास लग्नसोहळ्याला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, चंद्रकांत खैरे, आ. उदयसिंह राजपूत यांनीही उपस्थिती दर्शवली. त्यानंतर त्यांनी वधुवरास आशीर्वाद दिले. प्रसंगी उध्दव ठाकरे निघून गेल्यानंतर तब्बल अर्ध्या तासानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांत पाटील, आ. अतुल सावे, खा. भागवत कराड लग्नमंडपात पोहचले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी समोरासमोर येण्यास टाळल्याचे चर्चा सुरू होती.
हेही वाचा :
Girish Mahajan Vs Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी लोकसभा, विधानसभेत निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन
MVA On Rohit Pawar: ‘हा पळून जाणारा दादा नाहीये’- मविआचा सरकार आणि तपास यंत्रणेला इशारा
MVA On Rohit Pawar: ‘हा पळून जाणारा दादा नाहीये’- मविआचा सरकार आणि तपास यंत्रणेला इशारा
Latest Marathi News दानवेंच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात ठाकरे-फडणवीसांनी समोरासमोर येण्याचे टाळले Brought to You By : Bharat Live News Media.
