नागपूर : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी १०० कुटुंबामागे एक प्रगणक

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे. 100 कुटुंबामागे एका प्रगणकाची नेमणूक करीत प्रशिक्षणानंतर सर्वेक्षणाचे काम चार दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. Maratha Reservation राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या … The post नागपूर : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी १०० कुटुंबामागे एक प्रगणक appeared first on पुढारी.

नागपूर : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी १०० कुटुंबामागे एक प्रगणक

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे. 100 कुटुंबामागे एका प्रगणकाची नेमणूक करीत प्रशिक्षणानंतर सर्वेक्षणाचे काम चार दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. Maratha Reservation
राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या संपूर्ण सर्वेक्षण मोहिमेचे तालुकास्तरावर तहसिलदार इन्सिडंट कमांडर असून त्यांना प्रगणक नेमणूक करण्याचे अधिकार असणार आहेत. तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, शिक्षक, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह आवश्यक प्रगणकांच्या नियुक्त्या करण्याचे अधिकार त्यांना असतील. यासोबतच गरजेनुसार राखीव कर्मचारी वर्गही नियुक्त करण्यात यावा. Maratha Reservation
सर्वेक्षणाची चुकीची माहिती समाज माध्यमांवरून प्रसारित करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. गोखले इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेकडून सर्वेक्षणाच्या कामकाजासाठीचे सॅाफ्टवेअर तयार करण्यात येत असून हे सॅाफ्टवेअर युजर फ्रेंडली असणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्या प्रश्नावलीतील माहिती हॅन्डहेल्ड डिव्हाईसद्वारे बहुपर्यायी स्वरूपात प्रगणकांनी भरायची आहे. जिल्हास्तरावर मास्टर ट्रेनर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याद्वारे सर्व प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हेही वाचा 

नागपूर : धावत्या रेल्वेत सहा जणांकडून लूटमार
School Van Drivers Strike : नागपूरमध्ये स्कूल व्हॅन चालकांचा एक दिवसीय संप
नागपूर : नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक

Latest Marathi News नागपूर : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी १०० कुटुंबामागे एक प्रगणक Brought to You By : Bharat Live News Media.