जालना : भार्डी – हिवरा रोडवर भारत फायनान्सच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून दीड लाख लुटले
सुखापुरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : भारत फायनान्सच्या एका कर्मचाऱ्याला रस्त्यात आडवून मारहाण करत तिघा चोरट्यांनी १ लाख ७६ हजार रुपये रोख तसेच ८ हजार रुपये किमतीचा टॅब चोरून पळ काढला. ही घटना अंबड तालुक्यातील भार्डी ते हिवरा फाटा रोडवर गुरूवारी ( दि. ४) रात्री नऊच्या सुमारास घडली. लुटमारीच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी आदित्य चव्हाण यांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, भारत फायनान्स मधील कर्मचारी आदित्य अशोक चव्हाण (रा. तीर्थपुरी ता.घनसावंगी) हे गुरूवारी रात्री भार्डी ते हिरवा फाटा रोडवरून तीर्थपूरीकडे जात होते. परिसरात रहदारी नसल्याने तिघा चोरट्यांनी चव्हाण यांच्या मोटरसायकलीचा पाठलाग केला. व निर्जनस्थळी मोटरसायकल आडवून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. व त्यांच्या बॅगेतील १ लाख ७६ हजार रूपयांची रक्कम व किमती टॅब असणारी बॅग हिसकावून घेऊन पसार झाले. याप्रकरणी आदित्य चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा चोरट्यांवर तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सपोनी साजीद अहमद करीत आहेत.
हेही वाचा :
Crime News : साहित्य पोहोचवण्याच्या बहाण्याने फसवणूक
Crime News : घरफोडी करणार्याच्या महाळुंगे पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Crime News : जमीन विक्रीच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक
Latest Marathi News जालना : भार्डी – हिवरा रोडवर भारत फायनान्सच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून दीड लाख लुटले Brought to You By : Bharat Live News Media.