श्रीरामांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवले ! जितेंद्र आव्हाडांवर पुण्यात गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन : श्रीराम यांच्या आहारपद्धतीबाबत धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आव्हाड यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. आव्हाड यांच्यावर कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी … The post श्रीरामांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवले ! जितेंद्र आव्हाडांवर पुण्यात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

श्रीरामांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवले ! जितेंद्र आव्हाडांवर पुण्यात गुन्हा दाखल

Bharat Live News Media ऑनलाईन : श्रीराम यांच्या आहारपद्धतीबाबत धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आव्हाड यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. आव्हाड यांच्यावर कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी येथील राष्ट्रवादी चिंतन शिबिरात बोलताना ‘श्रीराम हे मांसाहारी होते’ असे वक्तव्य करून आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली होती. विशेष म्हणजे सगळीकडून टीकेची झोड उठल्यानंतर आव्हाड यांनी आपल्या विधानावर माफीही मागितली होती. पण यावर पुणे शहर  भाजपाने आक्रमक भूमिका घेत निषेध मोर्चाही काढला होता. त्यानंतर पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आव्हाड यांच्याबाबत तक्रार दाखल केली होती.
Latest Marathi News श्रीरामांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवले ! जितेंद्र आव्हाडांवर पुण्यात गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.