पिंपरी : राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड यांच्याविरोधात भाजप आक्रमक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी येथे भव्य मंदिर लोकार्पण आणि श्रींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. असे असताना प्रभू श्रीराम यांच्याबाबत विघ्नसंतुष्ट लोकांकडून वादग्रस्त वक्तव्य करून शुभकार्यात ‘मिठाचा खडा’ टाकण्याचे काम केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा त्यामध्ये समावेश आहे, … The post पिंपरी : राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड यांच्याविरोधात भाजप आक्रमक appeared first on पुढारी.

पिंपरी : राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड यांच्याविरोधात भाजप आक्रमक

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी येथे भव्य मंदिर लोकार्पण आणि श्रींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. असे असताना प्रभू श्रीराम यांच्याबाबत विघ्नसंतुष्ट लोकांकडून वादग्रस्त वक्तव्य करून शुभकार्यात ‘मिठाचा खडा’ टाकण्याचे काम केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा त्यामध्ये समावेश आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात शहर भाजपाच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली. त्यांचा निषेध करण्यासाठी पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी आमदार उमा खापरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा पक्ष प्रवक्ते राजू दुर्गे, उपाध्यक्ष सिद्धेश्वर बारणे, आशा काळे, रवी देशपांडे, विनोद मालू, सरचिटणीस संजय मंगोडेकर, शैला मोळक, नामदेव ढाके, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाडये, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे आदी उपस्थित होते.
शंकर जगताप म्हणाले, ‘जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये तणाव वाढत आहे. आपली पोळी भाजून घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांना यापूर्वीदेखील अनेकदा अशी निराधार वक्तव्ये भोवली आहेत. त्यांच्या या वक्तव्यांवर महाविकास आघाडीचे नेते मौन बाळगून आहेत. आमच्या आराध्यांविषयी बेताल वक्तव्ये करू नये. अन्यथा त्यांना आमच्या प्रखर विरोधाचा सामना करावा लागेल.’

राजगडवरून दै. ’Bharat Live News Media’स शिवप्रेमींकडून शुभेच्छा
Jalgaon News | राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील
लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिर : फडणवीस राहणार उपस्थित

Latest Marathi News पिंपरी : राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड यांच्याविरोधात भाजप आक्रमक Brought to You By : Bharat Live News Media.