Crime News : जमीन विक्रीच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक

पिंपरी : जमीन विक्रीच्या बहाण्याने दोघांनी मिळून एकाची 27 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार डिसेंबर 2021 ते 28 जून 2023 या कालावधीत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथे घडला. रूपेश वासुदेव नाईकरे (34, रा. मोशी) यांनी बुधवारी (दि. 3) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मनोज सरायनाथ रॉय (48, रा. पिंपरी), … The post Crime News : जमीन विक्रीच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Crime News : जमीन विक्रीच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक

पिंपरी : जमीन विक्रीच्या बहाण्याने दोघांनी मिळून एकाची 27 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार डिसेंबर 2021 ते 28 जून 2023 या कालावधीत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथे घडला. रूपेश वासुदेव नाईकरे (34, रा. मोशी) यांनी बुधवारी (दि. 3) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मनोज सरायनाथ रॉय (48, रा. पिंपरी), अशोक सखाराम टाकसाळ (41, रा. संतनगर, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादी यांना मोशी येथील दोन जागा एक कोटी रुपयांना देतो असे सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांच्याकडून अ‍ॅडव्हान्स म्हणून 30 लाख रुपये घेतले. त्यानंतर करारनामा केला. दरम्यान, करारनाम्याप्रमाणे आरोपींनी खरेदीखत करून दिले नाही. आरोपी हे फिर्यादी यांना 27 लाख रुपये देणे होते. मात्र, पैसे परत न करता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा 

Nashik News : राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन
रायगड: पोलीस उपअधीक्षक संजय सावंत यांचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू
Deepika Padukone : दीपिकाचे आई होण्याचे संकेत; मुले खूप आवडतात!

Latest Marathi News Crime News : जमीन विक्रीच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक Brought to You By : Bharat Live News Media.