एमएस धोनीची १५ कोटींची फसवणूक, कोर्टात धाव, प्रकरण काय?
Bharat Live News Media ऑनलाईन : भारताचा महान क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याने त्याच्या माजी व्यावसायिक भागीदारांविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यात त्याने सुमारे १५ कोटींची फसवणूक केल्याचा दावा आहे. एमएस धोनीने आरका स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांच्याविरुद्ध रांची न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
मिहिर दिवाकर यांनी जागतिक स्तरावर क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी २०१७ मध्ये धोनी सोबत करार केला होता. मात्र, दिवाकर यांनी करारात नमूद केलेल्या अटींचे पालन केले नाही. या कराराच्या अटींनुसार फ्रँचायझी फी आणि नफा वाटून घेण्यास आरका स्पोर्ट्स बांधील होते. पण त्यांनी या अटींचे पालन केले नाही.
अनेक प्रयत्न करूनही करारात नमूद केलेल्या अटी व शर्तींकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, धोनीने (MS Dhoni) ने १५ ऑगस्ट २०२१ रोजी आरका स्पोर्ट्सला दिलेले अधिकृत पत्र मागे घेतले आणि अनेक कायदेशीर नोटिसा पाठवल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
विधी असोसिएट्सच्या माध्यमातून धोनीचे प्रतिनिधीत्व करणारे दयानंद सिंह यांनी असा दावा केली की त्यांची आरका स्पोर्ट्सने फसवणूक केली आहे आणि त्यामुळे त्यांचे १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
हे ही वाचा :
पंतच्या पुनरागमनानंतर केएल राहुल घेणार ‘या’ खेळाडूची जागा
वन-डे मालिकेनंतर भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेत भिडणार
WTC Points Table मध्ये मोठा बदल! टीम इंडियाची अव्वल स्थानी झेप
Latest Marathi News एमएस धोनीची १५ कोटींची फसवणूक, कोर्टात धाव, प्रकरण काय? Brought to You By : Bharat Live News Media.