‘ये दोस्ती…’ केजरीवालांकडून सिसोदिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया हे गेल्या ११ महिन्यांपासून दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी तुरूंगात आहेत. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात त्यांची ईडी आणि सीबीआय चौकशी सुरू आहे. दरम्यान, आज (दि.५) मनीष सिसोदिया यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरूंगातील त्यांचा दोस्त मनीष  यांना वाढदिवसाच्या … The post ‘ये दोस्ती…’ केजरीवालांकडून सिसोदिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! appeared first on पुढारी.
‘ये दोस्ती…’ केजरीवालांकडून सिसोदिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया हे गेल्या ११ महिन्यांपासून दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी तुरूंगात आहेत. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात त्यांची ईडी आणि सीबीआय चौकशी सुरू आहे. दरम्यान, आज (दि.५) मनीष सिसोदिया यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरूंगातील त्यांचा दोस्त मनीष  यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदियांसोबतचा जुना फोटो आणि संदेश त्यांच्या ‘X’ अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Kejriwal Wish to Sisodia)
Kejriwal Wish to Sisodia: विश्वास, आपुलकी, मैत्री तुटणार नाही- केजरीवाल
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ही मैत्री खूप जुनी आहे. आमचा स्नेह आणि विश्वास खूप मजबूत आहे. जनतेसाठी काम करण्याची ही आवडही खूप जुनी आहे. षड्यंत्रकर्त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी. हा विश्वास, ही आपुलकी आणि ही मैत्री कधीही तुटणार नाही”, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी तुरूंगातील सिसोदीया यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. (Kejriwal Wish to Sisodia)
हुकूमशाहीच्या युगात मनीषचे धैर्य सर्वांना प्रेरणा देते
खोटे गुन्हे दाखल करून भाजपने गेल्या 11 महिन्यांपासून मनीषला तुरुंगात डांबले आहे. पण मनीष त्यांच्या दडपशाहीसमोर खंबीरपणे उभा आहे, त्यांच्या हुकूमशाहीपुढे आजपर्यंत झुकलेला नाही आणि भविष्यातही झुकणार नाही. हुकूमशाहीच्या या युगात मनीषचे धैर्य आपल्या सर्वांना प्रेरणा देते. (Kejriwal Wish to Sisodia)

ये दोस्ती बहुत पुरानी है। हमारा स्नेह और भरोसा बहुत मज़बूत है। जनता के लिए काम करने का ये जुनून भी बहुत पुराना है। साज़िश रचने वाले लाख कोशिश कर लें.. ये भरोसा, ये स्नेह और ये दोस्ती कभी नहीं टूटेगी।
बीजेपी ने झूठे केस लगाकर मनीष को पिछले 11 महीने से जेल में रखा हुआ है। लेकिन… pic.twitter.com/4ICoifHQ4v
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 5, 2024

हेही वाचा:

अरविंद केजरीवाल आजही ईडीच्या चौकशीला मारणार ‘दांडी’
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल ईडीचा समन्स चुकवत १० दिवसांच्या विपश्यनेला जाणार
Manish Sisodia Bail Application: मनीष सिसोदीया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण, न्यायालयाने निर्णय ठेवला राखून
मनीष सिसोदीया यांच्या ईडी कोठडीत वाढ, जामीन अर्जावर १२ एप्रिलला सुनावणी

 
Latest Marathi News ‘ये दोस्ती…’ केजरीवालांकडून सिसोदिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! Brought to You By : Bharat Live News Media.