Pune : शिर्सूफळला रस्त्याचे काम अडवले

शिर्सूफळ : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात प्रजिमा 61 सासवड-सुपा-उंडवडी-पारवडी-भिगवण या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम शिर्सूफळ येथे सुरू आहे. त्यासाठी सहा ते सात फुटांचा चढ खोदल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. येथे सुरू असलेल्या कामामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असताना पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली गेली नाही. दोन्ही बाजूने समान काम होत नसल्याने ग्रामस्थांनी हे काम … The post Pune : शिर्सूफळला रस्त्याचे काम अडवले appeared first on पुढारी.

Pune : शिर्सूफळला रस्त्याचे काम अडवले

शिर्सूफळ : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती तालुक्यात प्रजिमा 61 सासवड-सुपा-उंडवडी-पारवडी-भिगवण या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम शिर्सूफळ येथे सुरू आहे. त्यासाठी सहा ते सात फुटांचा चढ खोदल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. येथे सुरू असलेल्या कामामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असताना पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली गेली नाही. दोन्ही बाजूने समान काम होत नसल्याने ग्रामस्थांनी हे काम अडवले आहे. सासवड-भिगवण रस्ता कामामध्ये रस्त्याच्या कडेला असणारे तीन विद्युत खांब काढले जाणार होते. परंतु एकच खांब काढण्यात आला, तर दोन खांब काढण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यातील धोकादायक खांब काढण्यासाठी महावितरण कंपनीला दि. 12 डिसेंबर रोजी पत्र दिले आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण कंपनीचा यांच्या समन्वयाअभावी नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. संबंधित ठेकेदाराकडून काम करीत असताना जलवाहिनी तसेच ड्रेनेज लाईन फुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या बाजूच्या लोकांना रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा व विद्युत खांब लवकरात लवकर काढण्यासह तात्पुरत्या स्वरूपात रस्ता करून देण्याचीही मागणी ग्रामस्थांची आहे.
Latest Marathi News Pune : शिर्सूफळला रस्त्याचे काम अडवले Brought to You By : Bharat Live News Media.