Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : केपटाऊनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेत भारताकडून केएल राहुलने चमकदार कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने प्रथमच विकेटकिपिंग केले. यासह त्याने संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. यामध्ये त्याने राहुलनेही फलंदाजीतही उत्तम कामगिरी केली. द. आफ्रिका दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावांत त्याने 113 धावा केल्या. मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. (Rishabh Pant)
ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत राहुलने संघ व्यवस्थापनाला आश्वासन दिले होते की, तो कसोटी सामन्यात विकेटकिपिंग करू शकतो. एकदिवसीय विश्वचषकासह अनेक सामन्यांमध्ये त्याने विकेटकीपर फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याच्यावर विश्वास व्यक्त केला होता. उत्तम कामगिरी करत राहुलने त्यांना निराश केले नाही. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ऋषभ पंतचे कसोटी संघात पुनरागमन झाल्यावर राहुल कोणाच्या जागी खेळणार? भारतातील फिरकी खेळपट्ट्यांवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो विकेटकिपिंग करणार का? (Rishabh Pant)
काय म्हणाले संजय मांजरेकर?
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. संघातील स्थानासाठी राहुलची स्पर्धा ऋषभ पंतशी नसून श्रेयस अय्यरशी आहे, असे त्यांचे मत आहे. दुसऱ्या कसोटीनंतर बोलताना मांजरेकर यांनी राहुलचे कौतुक केले आणि सांगितले की, विकेटकीपर-फलंदाज सर्व फॉरमॅटमध्ये प्रत्येक संधीसाठी झगडत असतो. मांजरेकरांना असे वाटते की राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यात पाचव्या स्थानासाठी स्पर्धा होवू शकते.
केपटाऊन कसोटीनंतर मांजरेकर म्हणाले, “मला वाटते की तो एक असा खेळाडू आहे जो फॉरमॅटनुसार खेळ करतो. मी आतापासून दोन वर्षांचा विचार करत आहे आणि मला वाटते की तो मधल्या फळीत फलंदाजीत खरोखरच चांगला असेल. जेव्हा ऋषभ पंतचे पुनरागमन होईल. तेव्हा यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून पुनरागमन करेल. पंतची फलंदाजी आणि विकेटकीपिंग दोन्ही अतिशय उत्तम आहे. मांजरेकर यांनी राहुलच्या पहिल्या कसोटीतील शतकाचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, ‘ती खेळी पूर्णपणे अविश्वसनीय होती. त्या खेळपट्टीवर अशी खेळी करणे हे कौतुकास्पद आहे’
कसोटी गुणतालिकेत भारत अव्वलस्थानी
या विजयामुळे भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमधील हा भारताचा दुसरा विजय आहे. आफ्रिकेचा दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यामुळे त्यांची घसरण झाली. मालिकेतील पहिल्या कसोटी पराभवामुळे भारत सहाव्या स्थानावर घसरण झाली होती. न्यूझीलंड तीन तर ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. बांगलादेश गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ पाकिस्तान (सहावा), वेस्ट इंडिज (सातव्या), इंग्लंड (आठव्या) आणि श्रीलंका (नवव्या) स्थानावर आहेत.
𝘼 𝙘𝙧𝙖𝙘𝙠𝙚𝙧 𝙤𝙛 𝙖 𝙬𝙞𝙣! ⚡️ ⚡️#TeamIndia beat South Africa by 7⃣ wickets in the second #SAvIND Test to register their first Test win at Newlands, Cape Town. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/PVJRWPfGBE pic.twitter.com/vSMQadKxu8
— BCCI (@BCCI) January 4, 2024
हेही वाचा :
IND W vs AUS W T20 : वन-डे मालिकेनंतर भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेत भिडणार
NCP Disqualification Case : राष्ट्रवादीवरील दावेदारीसाठी १२ दिवसांची कायदेशीर लढाई! सुनावणीचे वेळापत्रक तयार
Share Market Today | सेन्सेक्स ७२,१०० पार, निफ्टी २१,७०० वर, कोणते शेअर्स तेजीत?
The post पंतच्या पुनरागमनानंतर केएल राहुल घेणार ‘या’ खेळाडूची जागा appeared first on Bharat Live News Media.