वन-डे मालिकेनंतर भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेत भिडणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांदरम्यान तीन सामन्यांच्या T20 मालिकेला आजपासून (दि.5) सुरूवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.एकदिवसीय मालिकेत 0-3 अशा पराभवानंतर ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव स्विकारल्यानंतर भारतीय संघ कसे पुनरागमन करतो यावर सर्वांचे लक्ष आहे. भारतीय संघाने एकमेव कसोटी सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत … The post वन-डे मालिकेनंतर भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेत भिडणार appeared first on पुढारी.

वन-डे मालिकेनंतर भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेत भिडणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांदरम्यान तीन सामन्यांच्या T20 मालिकेला आजपासून (दि.5) सुरूवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.एकदिवसीय मालिकेत 0-3 अशा पराभवानंतर ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव स्विकारल्यानंतर भारतीय संघ कसे पुनरागमन करतो यावर सर्वांचे लक्ष आहे. भारतीय संघाने एकमेव कसोटी सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली होती. परंतु, वन-डे मालिकेत भारतीय संघाने सुमार कामगिरी केली. (IND W vs AUS W T20)
यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. सहा वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका गमावली होती.
वनडेमध्ये खराब क्षेत्ररक्षण चिंतेचे कारण
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनेक झेल सोडणे भारतीय संघाला महागात पडले. संघाचा अवघ्या तीन धावांनी पराभव झाला. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सवर 338 धावांची मोठी धावसंख्या उभारली आणि अवघ्या 148 धावांवर भारतीय संघ बाद झाला. पहिला एकदिवसीय सामना सहा विकेटने हरला होता. भारताने गेल्या दोन सामन्यात एकूण आठ झेल सोडले आहेत. (IND W vs AUS W T20)
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 31 सामने झाले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने केवळ सहा सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने 23 सामने जिंकले आहेत. यामध्ये एक सामना बरोबरीत तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारतीय मैदानावर या दोघांमध्ये 11 सामने झाले. यामध्ये टीम इंडियाला केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला. आणि उर्वरित 10 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले.

💬 💬 “Everyone is excited for the T20I series.”#TeamIndia captain @ImHarmanpreet talks about the mood in the camp ahead of the #INDvAUS T20I series opener. @IDFCFIRSTBank pic.twitter.com/zmuOjhH99W
— BCCI Women (@BCCIWomen) January 4, 2024

T20 मालिकेसाठी दोन्ही संघ  यातून निवडणार
भारत : शेफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, मन्नत कश्यप, कनिका आहुजा, मिन्नू भैय्या, मनीका अहुजा. , सायाका इशाक, तीतस साधू.
ऑस्ट्रेलिया : फोबी लिचफिल्ड, अॅलिसा हिली (कर्णधार/यष्टीरक्षक), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम, एलाना किंग, किम गर्थ, मेगन शुट, ग्रेस हॅरिस, हेदर ग्रॅहम, डार्सी ब्राउन, जेस जोनासेन.
हेही वाचा :

नाशिककरांनो हात जोडुन विनंती ; चुकीच्या लोकांना बँकेत पाठवू नका : अजित पवार
Glynis Johns Death : ‘मेरी पॉपिन्स’ फेम अभिनेत्री ग्लिनिस जॉन्स यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन
Mizoram Earthquake : मिझोरामला भुकंपाचा सौम्य धक्का

The post वन-डे मालिकेनंतर भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेत भिडणार appeared first on Bharat Live News Media.