सातव्या मुलीची सातवी मुलगी मध्ये होणार सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत ६ जानेवारीला सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा होणार आहे. नेत्रा, इंद्राणी, शेखर आणि अव्दैत त्रिनयना देवीच्या मंदिरात, मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी भुयार खोदायचं ठरवतात. तर दुसरीकडे रूपालीसुद्धा पंचपिटिका रहस्यातील चौथी पेटी आपल्याला कशी मिळेल, याचा विचार करते. त्याचवेळी विरोचकाचा सेवक असलेला नाग तिथे येतो. नागामुळे रूपालीला पेटी कुठे आहे, … The post सातव्या मुलीची सातवी मुलगी मध्ये होणार सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा appeared first on पुढारी.

सातव्या मुलीची सातवी मुलगी मध्ये होणार सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत ६ जानेवारीला सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा होणार आहे. नेत्रा, इंद्राणी, शेखर आणि अव्दैत त्रिनयना देवीच्या मंदिरात, मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी भुयार खोदायचं ठरवतात. तर दुसरीकडे रूपालीसुद्धा पंचपिटिका रहस्यातील चौथी पेटी आपल्याला कशी मिळेल, याचा विचार करते. त्याचवेळी विरोचकाचा सेवक असलेला नाग तिथे येतो. नागामुळे रूपालीला पेटी कुठे आहे, हे कळतं. रूपाली नागाला आज्ञा देते की, मला पेटीकडे घेऊन चल, त्याप्रमाणे तो नाग रूपालीला त्रिनयना देवीच्या मंदिरात घेऊन जातो.
सातव्या मुलीची सातवी मुलगी
नेत्रा आणि अद्वैतसुद्धा रात्रीच वावोशीला जायचं ठरवतात. रूपाली त्रिनयना देवीच्या मंदिरात पोहोचते. रूपालीमध्ये संचारत असलेला विरोचक देवीला आव्हान देतो. त्यानंतर सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा होतो. आता हे सर्वात मोठं रहस्य काय असेल, पंचपिटिका रहस्यातील चौथी पेटी कशी आणि कुणाला सापडणार हे सर्व प्रेक्षकांना ६ जानेवारीला रात्री १०.३० वा. पहायला मिळणार आहे.
Latest Marathi News सातव्या मुलीची सातवी मुलगी मध्ये होणार सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा Brought to You By : Bharat Live News Media.