Pune Crime News : पिस्तूल बाळगणारा सराईत जेरबंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खराडी बायपास परिसरात पिस्तुलासह फिरणार्‍या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले असून, आरोपीवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत. राकेश शंकर ठोकळ (वय 23, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ठोकळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. विमानतळ … The post Pune Crime News : पिस्तूल बाळगणारा सराईत जेरबंद appeared first on पुढारी.

Pune Crime News : पिस्तूल बाळगणारा सराईत जेरबंद

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : खराडी बायपास परिसरात पिस्तुलासह फिरणार्‍या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले असून, आरोपीवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे पाच ते सहा गुन्हे
दाखल आहेत. राकेश शंकर ठोकळ (वय 23, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ठोकळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. विमानतळ पोलिस ठाण्याचे पथक हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान खराडी बायपास परिसरात एकजण संशयितरीत्या थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती अंमलदार शैलेश नाईक व सचिन जाधव यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून ठोकळ याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. तपासात त्याने अवैधरीत्या विनापरवाना पिस्तूल बाळगल्याचे समोर आले असून, पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याने हे पिस्तूल नेमके कोठून आणले, याबाबत विमानतळ पोलिस तपास करत आहेत. विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, गुन्हे निरीक्षक संगीता माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय चंदन, अंमलदार सचिन कदम, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, राकेश चांदेकर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
हेही वाचा

नाशिककरांनो हात जोडुन विनंती ; चुकीच्या लोकांना बँकेत पाठवू नका : अजित पवार
पाहू नाट्य संमेलन विसरू नका कोणी; लोक कलावंताकडून नाट्य संमेलनाचा प्रचार
जिनपिंग यांचे अपयश!

Latest Marathi News Pune Crime News : पिस्तूल बाळगणारा सराईत जेरबंद Brought to You By : Bharat Live News Media.