एनआयबीएममधील रस्त्यांचे लवकरच रुंदीकरण : आयुक्त विकास ढाकणे

कोंढवा : पुढारी वृत्तसेवा : कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम परिसरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून, प्रथम क्लाऊड नाईन येथील फॉरेस्टमधून जाणार्‍या रस्त्याचे काम प्रामुख्याने मार्गी लावण्यात येईल. या भागातील रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटवण्याची संबंधित अधिकार्‍यांनी कार्यवाही करावी, असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले आहेत. एनआयबीएम परिसरातील वाहतूक कोंडीची … The post एनआयबीएममधील रस्त्यांचे लवकरच रुंदीकरण : आयुक्त विकास ढाकणे appeared first on पुढारी.

एनआयबीएममधील रस्त्यांचे लवकरच रुंदीकरण : आयुक्त विकास ढाकणे

कोंढवा : Bharat Live News Media वृत्तसेवा : कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम परिसरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून, प्रथम क्लाऊड नाईन येथील फॉरेस्टमधून जाणार्‍या रस्त्याचे काम प्रामुख्याने मार्गी लावण्यात येईल. या भागातील रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटवण्याची संबंधित अधिकार्‍यांनी कार्यवाही करावी, असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले आहेत.
एनआयबीएम परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी नागरिकांसमवेत या भागाची पाहणी केली. माजी नगरसेविका नंदा लोणकर यांच्या मागणीनुसार अधिकार्‍यांचा हा पाहणी दौरा आयोजित केला होता. शिक्षण मंडळाचे माजी सदस्य नारायण लोणकर, अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, मालमत्ता विभागाचे उपअभियंता मुश्ताक बागवान, अतिक्रमणचे निरीक्षक गायकवाड, विद्युत मुख्य अभियंता श्रीनिवास कुंदल आदी या वेळी उपस्थित होते.
कोंढवा खुर्द मुख्य गावठाण रस्ता, ज्योती चौक ते बेकर्स पॉईंट ते उंड्री रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. तसेच बेकर्स पॉइंट ते क्लाऊड नाईन सोसायटीपर्यंतच्या रस्त्याचे व बायपास मार्गाचे रुंदीकरण होणार आहे. फॉरेस्टमधून क्लाऊड नाईनकडे जाणार्‍या रस्त्याचे उर्वरित काम लवकरच सुरू करण्याचे आश्वासन या वेळी अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी दिले. सर्वे नंबर 37 मधील अमेनिटी क्षेत्रात पीपी अंतर्गत हॉस्पिटल बांधण्याची मागणी याप्रसंगी नंदा लोणकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली. या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा

पावसाच्या पाण्याने होर्डिंगमधून उमटतात ‘मेघ मल्हार’चे सूर!
जिनपिंग यांचे अपयश!
सांगली : कुपवाड येथे दुचाकींच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू

Latest Marathi News एनआयबीएममधील रस्त्यांचे लवकरच रुंदीकरण : आयुक्त विकास ढाकणे Brought to You By : Bharat Live News Media.