2023 ठरले सर्वात उष्ण वर्ष!

वॉशिंग्टन : जागतिक तापमानवाढीचे परिणाम आता प्रकर्षाने समोर येऊ लागले आहेत. एरवी वर्षभर कुडकुडणार्‍या युरोपमध्येही हल्ली 45 अंश सेल्सिअसपर्यंत पारा जात आहे. गतवर्ष म्हणजेच 2023 वर्षाने तर उष्णतेचे सर्व रेकॉर्डस् मोडीत काढले असून, हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. जागतिक हवामान संघटनेकडून यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. हवामान बदल आणि सध्या सुरू … The post 2023 ठरले सर्वात उष्ण वर्ष! appeared first on पुढारी.

2023 ठरले सर्वात उष्ण वर्ष!

वॉशिंग्टन : जागतिक तापमानवाढीचे परिणाम आता प्रकर्षाने समोर येऊ लागले आहेत. एरवी वर्षभर कुडकुडणार्‍या युरोपमध्येही हल्ली 45 अंश सेल्सिअसपर्यंत पारा जात आहे. गतवर्ष म्हणजेच 2023 वर्षाने तर उष्णतेचे सर्व रेकॉर्डस् मोडीत काढले असून, हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. जागतिक हवामान संघटनेकडून यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
हवामान बदल आणि सध्या सुरू असलेल्या ‘अल निनो’च्या परिस्थितीच्या एकत्रित परिणामामुळे गतवर्षी ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत पृथ्वी आधीच 1.4 अंश सेल्सिअस पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा (1850-1900) अधिक उष्ण असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले होते. तसेच जगात हरितगृह वायूंचे प्रमाणही सतत वाढत असल्याचे निरीक्षणदेखील संशोधनातून समोर आले आहे. त्याचप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि समुद्राच्या पातळीत वाढ नोंदवली गेल्याचेदेखील अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.
अंटार्क्टिक समुद्रातील बर्फाचे आच्छादन घटल्याचे अहवालात नमूद केले गेले आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोखा’ चक्रीवादळ 2023 मधील जागतिक स्तरावरील सर्वात तीव्र चक्रीवादळांपैकी एक होते, असे जागतिक हवामान संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. गतवर्ष हे ब्रिटनमधील रेकॉर्डवरील सर्वाधिक उष्णतेचे दुसर्‍या क्रमांकावरील वर्ष होते, असे ब्रिटिश हवामान खात्यानेही म्हटले आहे. ते 2022 नंतर तापमानाबाबत थोडेच मागे आहे. वेल्श आणि नॉर्दन आयर्लंडसाठी 2023 सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले.
Latest Marathi News 2023 ठरले सर्वात उष्ण वर्ष! Brought to You By : Bharat Live News Media.