राज्यातील दूध उत्पादकांना मिळणार 135 कोटी अनुदान

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गाय दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच रुपये उनदान देण्याच्या निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादकांना 135 कोटी 44 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. (Milk Subsidy) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा निर्णय घेण्यात आला … The post राज्यातील दूध उत्पादकांना मिळणार 135 कोटी अनुदान appeared first on पुढारी.

राज्यातील दूध उत्पादकांना मिळणार 135 कोटी अनुदान

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : गाय दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच रुपये उनदान देण्याच्या निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादकांना 135 कोटी 44 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. (Milk Subsidy)
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा निर्णय घेण्यात आला याबाबत आपण सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, राज्यातील सहकारी दूध संघामार्फत ही अनुदान योजना राबवण्यात येणार आहे. सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकर्‍यांना 3.2 फॅट, 8.3 एसएनएफ करिता किमान 29 रुपये प्रतिलिटर इतका दर बँक खात्यावर ऑनलाईन जमा करावा लागणार आहे. दूध संघाने सदरची रक्कम जमा केल्यानंतर दूध उत्पादक शेतकर्‍यांना शासनामार्फत पाच रुपये प्रतिलिटर बँक खात्यावर डीबीटीद्वारे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (Milk Subsidy)
नोव्हेंबरमधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघामार्फत दररोज 43.69 लाख लिटर दूध संकलित करण्यात येते. 5 रुपये प्रती अनुदानाप्रमाणे दोन महिन्यांसाठी 135 कोटी 44 लाख रुपये इतके अनुदान मिळणार आहे. योजना 1 जानेवारी 2024 ते 29 फेब—ुवारी 2024 या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.
 
Latest Marathi News राज्यातील दूध उत्पादकांना मिळणार 135 कोटी अनुदान Brought to You By : Bharat Live News Media.