यवतमाळमधील वणी येथे जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग, लाखोंचा कापूस जळून खाक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे निळापूर ब्राम्हणी रोडवरील राजा एक्जीन जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग लागून, अंदाजे चार क्विंटल कापूस व सरकी जळाल्याची घटना आज (दि. ४) रात्री घडली. यावेळी जिनिंगमध्ये काम करीत असलेल्या 25 मजुरांचे प्राण सुदैवाने वाचले. सदर फॅक्टरीमध्ये जिनिंग प्रेसिंगचे काम 56 स्पिन मशिनवर सुरू होते. कापूस वाहकपट्ट्यावर घर्षण होऊन ठिणगी … The post यवतमाळमधील वणी येथे जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग, लाखोंचा कापूस जळून खाक appeared first on पुढारी.

यवतमाळमधील वणी येथे जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग, लाखोंचा कापूस जळून खाक

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे निळापूर ब्राम्हणी रोडवरील राजा एक्जीन जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग लागून, अंदाजे चार क्विंटल कापूस व सरकी जळाल्याची घटना आज (दि. ४) रात्री घडली. यावेळी जिनिंगमध्ये काम करीत असलेल्या 25 मजुरांचे प्राण सुदैवाने वाचले. सदर फॅक्टरीमध्ये जिनिंग प्रेसिंगचे काम 56 स्पिन मशिनवर सुरू होते. कापूस वाहकपट्ट्यावर घर्षण होऊन ठिणगी उडाल्याने ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार दोन ते तीन क्विंटल कापूस, एक क्विंटल सरकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असाव्या असा प्राथमिक अंदाज आहे. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मधून प्रचंड प्रमाणात धूर निघत होता. आग विझवण्याचे काम वणी नगरपरिषदेचा एक अग्निशमन बंब करीत होता. राजा एक्जीन जिनिंग-प्रेसिंग हे वणी तालुक्यातील सर्वात मोठे युनिट आहे हे विशेष.
Latest Marathi News यवतमाळमधील वणी येथे जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग, लाखोंचा कापूस जळून खाक Brought to You By : Bharat Live News Media.