एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ. माधव कुसेकर यांची नियुक्ती

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ. माधव कुसेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार गुरुवारी (दि. ४) स्विकारला. कुसेकर यांना 28 जून 2023 रोजी भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) पदी बढती देण्यात आली होती.
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने सेवानिवृत्त झाल्यानंतर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याकडे अतिरीक्त पदभार देण्यात आला होता. एसटीला पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक नसल्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये अडचणी येत होत्या. अखेर राज्य सरकारने यवतमाळ येथील जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांची एसटीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती केली.
आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा, असे निर्देश राज्याचे अपर मुख्य सचिव (सेवा) डॉ. राजगोपाल देवरा यांनी पत्राद्वारे दिले. त्यामुळे कुसेकर यांनी आपल्या पदाचा पदभार तातडीने स्वीकारला.
हेही वाचा
Rashmi Shukla New DGP of Maharashtra मोठी बातमी : महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लांची नियुक्ती
Latest Marathi News एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ. माधव कुसेकर यांची नियुक्ती Brought to You By : Bharat Live News Media.
