पाचोरावरून जळगावकडे जाणाऱ्या कारच्या धडकेत विद्यार्थीनीसह वयस्कर व्यक्ती ठार

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : पाचोरावरून जळगावकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने विद्यार्थिनीसह पादचाऱ्यांना धडक दिली. यामध्ये विद्यार्थिनी व एक वयस्कर व्यक्ती असे दोघेजण ठार झाले आहेत तर दोन जण जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. संतप्त नागरिकांनी घटनेतील चारचाकी जाळून रोश व्यक्त केला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एक चारचाकी पाचोऱ्याहून जळगावकडे भरधाव वेगाने जात होती. दरम्यान शिंदे हायस्कूलमधून दोन विद्यार्थिनी घरी जात होत्या. यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकीने गोराडखेडाजवळ या विद्यार्थीनींसह रस्त्यावरुन जाणाऱ्या इतर लोकांना जोराची धडक दिली. यामध्ये विद्यार्थिनी दुर्गा भागवत पवार (वय 15) आणि सुभाष पाटील (वय 62) हे जागीच ठार झाले, तर विद्यार्थीनी ऋतुजा राजेश भोयटे (पाटील) आणि परशुराम पाटील हे जखमी झाले. जखमींवर पाचोरा येथील श्रीकृष्ण हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघातातील चारचाकी ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त करत आरोपींना आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी कारमधील सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले. नागरिकांच्या संतापला अपघातामधील मारुती आगीत भस्मसात झाली.
कारमधील सर्वजण जळगाव येथील असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी तपास करुन गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी राहुल खताळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अपघात झाल्यानंतर महिला कर्मचारी यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे जमावाला शांत करता आले. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी घेतलेल्या निर्णयामुळे पुढील अनेक घटना टळल्या. ज्या कारमुळे अपघात झाला त्यातील प्रवाशांना नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागले. दोन्ही जखमीची परिस्थिती ही धोक्या बाहेर आहे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
Latest Marathi News पाचोरावरून जळगावकडे जाणाऱ्या कारच्या धडकेत विद्यार्थीनीसह वयस्कर व्यक्ती ठार Brought to You By : Bharat Live News Media.
