रत्नागिरी : सुसेरी नं.२ गावात गादीचा कारखाना जळून खाक

खेड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खाडीपट्टा विभागात असणाऱ्या सुसेरी क्रमांक २ या गावात एका गादी कारखान्याला अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण गादी कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग आज (दि. ४) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास लागली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सुसेरी क्रमांक २ या गावात … The post रत्नागिरी : सुसेरी नं.२ गावात गादीचा कारखाना जळून खाक appeared first on पुढारी.

रत्नागिरी : सुसेरी नं.२ गावात गादीचा कारखाना जळून खाक

खेड; Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील खाडीपट्टा विभागात असणाऱ्या सुसेरी क्रमांक २ या गावात एका गादी कारखान्याला अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण गादी कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग आज (दि. ४) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास लागली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सुसेरी क्रमांक २ या गावात माजी उपसरपंच गणपत महाडीक यांच्या मालकीच्या गादी कारखान्याला अचानक आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला कळवली. त्यानंतर तत्काळ अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
आणि शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र भीषण आगीमुळे संपूर्ण गादीचा कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Latest Marathi News रत्नागिरी : सुसेरी नं.२ गावात गादीचा कारखाना जळून खाक Brought to You By : Bharat Live News Media.