अमरावती महामार्गावर तिहेरी अपघात; पती-पत्नीचा मृत्यू, मुलगी जखमी

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूर -अमरावती महामार्गावरील राठी दवाखान्याजवळ आज (दि.४) झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात पती- पत्नी ठार झाले. तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षय गिरनाले व रजनी गिरनाले असे या मृत दाम्पत्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अक्षय सुभाषराव गिरनाले (रत्नापूर, जि. अमरावती) हे इर्टिका (डी.आय MH १२ LV 5939) या आपल्या चारचाकी गाडीने पत्नी रजनी हिला नागपूरला दवाखान्यात तपासणीकरिता घेऊन गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगीही सोबत होती. तपासणी करून नागपूर-अमरावती महामार्गाने परत येत असताना राठी दवाखान्याजवळ आल्यानंतर त्यांचे कारचे नियंत्रण सुटले. व त्यांची कार एका ट्रकला तसेच नागपूरकडे येणाऱ्या अल्टोला धडकली हा अपघात इतका भयंकर होता की पती- पत्नीचा कारमध्येच मृत्यू झाला. तर मागच्या सीटवर बसलेली त्यांची मुलगी बचावली. मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीने रविनगर येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अक्षय गिरनाले व रजनी गिरनाले यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी मेयो हॉस्पीटल येथे पाठविण्यात आले असून याप्रकरणी वाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रायन्नावार अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा :
Sindhudurg News: आंबोलीत धाराशिव, लातूरच्या पर्यटकांच्या गाडीचा भीषण अपघात; एकजण ठार, ६ जण जखमी
कोल्हापूर : आजऱ्याजवळील भीषण अपघातात गवंडी कामगार ठार
Assam Accident : आसाममध्ये भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत १४ ठार, २७ जखमी
Latest Marathi News अमरावती महामार्गावर तिहेरी अपघात; पती-पत्नीचा मृत्यू, मुलगी जखमी Brought to You By : Bharat Live News Media.
