ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची उबाठा पक्षातून हकालपट्टी

हुपरी; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Muralidhar Jadhav) यांची पक्षाने आज (दि. ४) तडकाफडकी हकालपट्टी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने खळबळ माजली आहे. गेली अनेक वर्षे जाधव हे जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत आहेत. हुपरीचे शहरप्रमुख ते जिल्हाप्रमुख असा त्यांचा शिवसेनेतील प्रवास आहे. गोकुळच्या शासन नियुक्त संचालक पदावरही उद्धव ठाकरे यानी ते … The post ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची उबाठा पक्षातून हकालपट्टी appeared first on पुढारी.

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची उबाठा पक्षातून हकालपट्टी

हुपरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Muralidhar Jadhav) यांची पक्षाने आज (दि. ४) तडकाफडकी हकालपट्टी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने खळबळ माजली आहे.
गेली अनेक वर्षे जाधव हे जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत आहेत. हुपरीचे शहरप्रमुख ते जिल्हाप्रमुख असा त्यांचा शिवसेनेतील प्रवास आहे. गोकुळच्या शासन नियुक्त संचालक पदावरही उद्धव ठाकरे यानी ते मूख्यमंत्री पदावर असताना त्यांची वर्णी लावली होती. गेली काही दिवस हातकणंगले लोकसभा मतदार संघात निष्ठावंतांना संधी द्यावी अशी मागणी त्यांची होती.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यानी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर जाधव यांनी शेट्टी यांच्यावर टीका केली होती. आज (दि. ४) त्यांच्या हकालपट्टीचे वृत्त सर्वत्र पसरले. शिवसेना भवन मधून त्यांच्या हकालपट्टीची अधिकृत घोषणा झाली आहे. मात्र याबाबत जाधव यांनी बोलण्याचे टाळले, दोन दिवसात आपण आपली भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Latest Marathi News ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची उबाठा पक्षातून हकालपट्टी Brought to You By : Bharat Live News Media.