श्रद्धा आणि समोसे!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरमध्ये ( Shraddha Kapoor ) कपूर’ कमी आणि ‘कोल्हापुरे’च अधिक आहे, असे नेहमीच दिसत असते. पद्मिनी कोल्हापुरेची भाची आणि शिवांगी कोल्हापुरेची कन्या असलेल्या श्रद्धामध्ये मराठी संस्कृतीचे प्रेम आणि गाण्याची आवडही आहे. पद्मिनीचे वडील पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकर यांचे आत्येभाऊ. ते स्वतः उत्तम गायक आणि वीणावादक होते. आपल्या आजोबांकडून आलेला गायनाचा वारसा श्रद्धाही पुढे चालवत असते.
संबंधित बातम्या
Twinkle Khanna : ट्विंकलची सायकल खांबाला धडकते तेव्हा..! (video)
Palak Tiwari- orry : पलक तिवारी- ऑरीचे चॅटिंग लिक
Aditi Rao Hydari : आदिती राव हैदरी -सिद्धार्थ लग्नबंधनात अडकणार
अभिनय, गायन आणि नृत्य या कलांवरील प्रेमाबरोबरच श्रद्धाने ( Shraddha Kapoor ) खवय्येगिरीची आवडही जपली आहे. तिच्या ‘स्त्री-2’ या चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाच्या सेटवरील तिचा एक फोटो आता समोर आला आहे. त्यामध्ये ती हातात समोशांनी भरलेली डिश घेऊन उभी असलेले दिसते. हे छायाचित्र फिल्मफेअरच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहे.
श्रद्धा खाण्यापिण्याची चांगलीच शौकीन आहे आणि नेहमी खाद्यपदार्थांचे फोटो शेअर करीत असते. आपल्या खवय्येगिरीविषयीही ती मुलाखतींमधून सांगत असते. आता तिने ‘स्त्री-2’च्या सेटवर खमंग समोशांवर ताव मारल्याचे स्पष्टच दिसते! ‘स्त्री’च्या यशानंतर आता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर ‘स्त्री-2’च्या शूटिंगमध्ये गुंतले आहेत. हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होईल.
View this post on Instagram
A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)
View this post on Instagram
A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)
Latest Marathi News श्रद्धा आणि समोसे! Brought to You By : Bharat Live News Media.
