नगर जिल्ह्यातील रब्बी पिकांची सुरुवात चांगली

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात जवळपास शंभर टक्के रब्बी पेरणी झाली असून, या रब्बी पिकांची नजर अंदाज पैसेवारी जाहीर झाली. जिल्ह्यातील सर्वच 1 हजार 21 रब्बी गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आहे. रब्बी पिकांची उगवण सर्वत्र चांगली आहे. मात्र, रब्बी पिके हाती लागली की नाही हे अडीच महिन्यानंतर 15 मार्च रोजी जाहीर होणार्‍या अंतिम … The post नगर जिल्ह्यातील रब्बी पिकांची सुरुवात चांगली appeared first on पुढारी.

नगर जिल्ह्यातील रब्बी पिकांची सुरुवात चांगली

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  जिल्ह्यात जवळपास शंभर टक्के रब्बी पेरणी झाली असून, या रब्बी पिकांची नजर अंदाज पैसेवारी जाहीर झाली. जिल्ह्यातील सर्वच 1 हजार 21 रब्बी गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आहे. रब्बी पिकांची उगवण सर्वत्र चांगली आहे. मात्र, रब्बी पिके हाती लागली की नाही हे अडीच महिन्यानंतर 15 मार्च रोजी जाहीर होणार्‍या अंतिम पैसेवारीतूनच निदर्शनास येणार आहे.
जिल्ह्यात एकूण 1 हजार 606 महसुली गावे असून, त्यापैकी 585 गावे खरीप तर 1 हजार 21 गावे रब्बी पिकांसाठी आहेत. अकोले व संगमनेर ही दोन्ही तालुके खरीप हंगामी आहेत. तर श्रीरामपूर, श्रीगोंदा, कर्जत व जामखेड या चारही तालुक्यांतील सर्वच गावे रब्बी हंगामी आहेत. त्यामुळे उर्वरित 12 तालुक्यांतील 1 हजार 21 गावे रब्बी हंगामीसाठी आहेत.
संबंधित बातम्या :

Jitendra Awad : नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला उलटे लटकवले
धक्कादायक ! उसात नवजात बालिकेचा मृतदेह
आदिवासी समाजाला न्याय मिळावा ही सरकारची भूमिका : रामदास आठवले

50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली जाते. या गावांना शासनाकडून काही सवलती दिल्या जातात. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. झालेला पाऊसही दमदार नव्हता. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम धोक्यात येणार असल्याची शक्यता आहे. यंदा रब्बी पिकांची शंभर टक्के पेरणी झालेली आहे. यामध्ये ज्वारी, गहू, मका, हरबरा आदी प्रमुख पिकांचा समावेश आहे. रब्बी पिकांची परिस्थिती कशी आहे. याचा अंदाज पैसेवारीव्दारे काढला जात आहे. त्यानुसार पेरणी झाल्यानंतरच महिनाभरात नजर अंदाच पैसेवारी जाहीर केली जाते. त्यानुसार ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांचा समावेश असलेल्या स्थानिक समितीव्दारे शेतपिकांच्या बांधावरुन पिकांची पाहाणी केली जाते.
त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 31 डिसेंबर रोजी 1 हजार 21 गावांतील पिकांची नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली. यामध्ये सर्वच गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आली आहे. महिनाभरानंतर 31 जानेवारीला सुधारित पैसेवारी जाहीर होणार आहे. सरत्या शेवटी पीक कापणी प्रयोगानंतर 15 मार्च रोजी अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे.
तालुकानिहाय अधिक पैसेवारीची गावे
कोपरगाव : 63, राहाता : 37, श्रीरामपूर : 56, राहुरी : 79, नगर : 116, नेवासा : 114, पाथर्डी 57, शेवगाव : 79,
पारनेर : 100, श्रीगोंदा : 115, कर्जत : 118, जामखेड : 87.
Latest Marathi News नगर जिल्ह्यातील रब्बी पिकांची सुरुवात चांगली Brought to You By : Bharat Live News Media.