धक्कादायक ! उसात नवजात बालिकेचा मृतदेह

खेड : खेड (ता.कर्जत) येथील आगवणवस्ती शिवारात नुकत्याच जन्म झालेल्या नवजात बालिकेचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आल्याने खेड परिसरात खळबळ उडाली आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनीच अंतःकरण पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ‘माते तू वैरीण’ या म्हणीची प्रचितीच या घटनेने आली आहे. या बालिकेच्या नाका-तोंडातून रक्त आल्याने तिचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते. नाळेसह खून … The post धक्कादायक ! उसात नवजात बालिकेचा मृतदेह appeared first on पुढारी.

धक्कादायक ! उसात नवजात बालिकेचा मृतदेह

खेड : खेड (ता.कर्जत) येथील आगवणवस्ती शिवारात नुकत्याच जन्म झालेल्या नवजात बालिकेचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आल्याने खेड परिसरात खळबळ उडाली आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनीच अंतःकरण पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ‘माते तू वैरीण’ या म्हणीची प्रचितीच या घटनेने आली आहे. या बालिकेच्या नाका-तोंडातून रक्त आल्याने तिचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
नाळेसह खून केलेली नकोशी युरियाच्या गोणीत माजी सरपंच लक्ष्मण कांबळे यांच्या उसाच्या शेतात टाकून दिली होती. ही नकोशी अनैतिक संबंधातून जन्माला आली असावी. ऊस शेती, जिल्ह्याची सरहद्द आदींचा फायदा घेऊन तिला येथे टाकण्यात आले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. कर्जतचे पोलिस निरीक्षक घनशाम बळप यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आला.
 
 
Latest Marathi News धक्कादायक ! उसात नवजात बालिकेचा मृतदेह Brought to You By : Bharat Live News Media.