पलक तिवारी- ऑरीचे चॅटिंग लिक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सोशल मीडिया सेन्सेशन ऑरी ऊर्फ ओरहान अवत्रमणी बर्याचवेळा बॉलीवूडच्या अनेक स्टारकिडस्सोबत पार्ट्यांमध्ये पाहायला मिळतो. अभिनेत्री पलक तिवारीसोबतही ऑरी अनेक कार्यक्रमांत दिसला आहे. आता या दोघांमधील व्हॉटस्अॅप चॅटस् लिक झाले आहेत. या चॅटस्चा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला. ( Palak Tiwari- orry )
संबंधित बातम्या
Aditi Rao Hydari : आदिती राव हैदरी -सिद्धार्थ लग्नबंधनात अडकणार
Bhumi Pednekar : भूमी पेडणेकर बनली पत्रकार!
Karan Johar : करणने चित्रपटांसाठी मिळवली खोटी समीक्षणे!
या चॅटमध्ये पलकने ऑरीची माफी मागितली, तर त्याने पलकला मिडल फिंगरचा इमोजी पाठवला आहे. यामध्ये पलकने अभिनेत्री सारा अली खानचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे या तिघांमध्ये नेमके काय शिजतेय, असा प्रश्न नेटकर्यांना पडला आहे.
ऑरी, मी पलक बोलतेय. तुला माफीच हवी असेल तर मी माफी मागते,’ असा मेसेज पलकने ऑरीला व्हॉटस्अॅपवर पाठवला. यावर ऑरी थेट ‘मिडल फिंगर’चा इमोजी पोस्ट करतो. त्यानंतर पलक म्हणते, सारासाठी असलेल्या आदरामुळे मी तुझी माफी मागत आहे.
यावर ऑरी म्हणतो, नाही बेब. तो माफी स्वीकारायला तयार नसल्याने पलक पुन्हा ‘आय एम सॉरी’ असे लिहिते. आणि त्यांच्यातील चॅटिंग सुरूच राहते. ( Palak Tiwari- orry )
View this post on Instagram
A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)
View this post on Instagram
A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)
Latest Marathi News पलक तिवारी- ऑरीचे चॅटिंग लिक Brought to You By : Bharat Live News Media.
