दक्षिण आफ्रिकेला नववा धक्का; रबाडा बाद
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. आज (दि.4) सामन्याचा दुसरा दिवस आहे. दुसर्या दिवशी बुमराहने दक्षिण आफ्रिकेला सलग दाेन धक्के दिले. निम्मा संघ तंबूत गेला. यानंतर मार्करम आणि मार्को जॅनसेन यांनी सावध खेळीचा प्रयत्न केला. मात्र ११ धावांवर खेळणार्या मार्कोला बुमराहने झेलबाद केले. यानंतर बुमराहने ३ धावांवर खेळणार्या केशव महाराजला यशस्वी जैस्वाल करवी झेलबाद करत दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का दिला. सामन्यातील दुसऱ्या डावाच्या ३२ व्या षटकात एडन मार्करमच्या रूपात आफ्रिकेला मोठा झटका बसला. कागिसो रबाडाच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला नववा धक्का बसला.
दक्षिण आफ्रिकेला नववा धक्का
कागिसो रबाडाच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला नववा धक्का बसला. 12 चेंडूत दोन धावा करून तो बाद झाला. प्रसिध कृष्णाच्या चेंडूवर तो रोहित शर्माकरवी झेलबाद झाला.
द. आफ्रिकाला मोठा झटका; ए़़डन मार्करम बाद
सामन्यातील दुसऱ्या डावाच्या ३२ व्या षटकात एडन मार्करमच्या रूपात आफ्रिकेला मोठा झटका बसला. त्याला भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजने रोहित शर्माकरवी झेलबाद केले. मार्करमने आपल्या खेळीत १०३ चेंडूत १०६ धावांची खेळी केली.
मार्करमचे झुंजार शतक
कसोटी सामन्यात आफ्रिकेच्या एका बाजूने फलंदाज बाद होत असताना एडन मार्करमने विकेट एक बाजू रोखून धरली. त्याने भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे संयमी फलंदाजी करत ९८ चेंडूत आपले शतक झळकावले. यामध्ये त्याने १६ चौकार आणि २ षटकार लगावले.
द. आफ्रिकाकडे ३० धावांची आघाडी
आज आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावाची सुरूवात ३ बाद ६२ या धावसंख्येपासून खेळण्यास सुरूवात केली. ही धावसंख्या ड्रिंक ब्रेकपर्यंत ७ बाद १२८ अशी होती. यामध्ये आफ्रिकेकडून एडन मार्करमने शानदार खेळी करत अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे द. आफ्रिकाने सामन्यात ३० धावांची आघाडी घेतली.
बुमराहने दुसऱ्या डावात पाच बळी पूर्ण
जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात पाच विकेट पूर्ण केल्या. त्याने केशव महाराजला बाद करून दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का दिला. चार चेंडूत तीन धावा करून महाराज यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद झाला.
बुमराहने यान्सेनला केले बाद
जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात भारताला सहावे यश मिळवून दिले. त्याने मार्को जॅनसेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ९ चेंडूत ११ धावा करून बुमराहला येनसेनने झेलबाद केले. बुमराहला दुसऱ्या डावात चौथे यश मिळाले.
द. आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत
आज दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या दिवसाच्या ६२/३ या धावसंख्येपुढे दुसऱ्या डावात खेळण्यास सुरुवात केली. पहिल्याच्या षटकात भारताला यश मिळाले. बुमराहच्या स्विंगने बेडिंगहॅमला चकवा दिला त्याने यष्टीरक्षक केएल राहुलकडे सोपा झेल दिला. त्याने १२ चेंडूत १२ धावा केल्या. दुसर्या डावात दक्षिण आफ्रिकेने ४ गडी गमावत ६६ धावा केल्या आहेत. भारताकडे ३२ धावांची आघाडी आहे.बुमराहने दक्षिण आफ्रिकेला सलग दुसरा धक्का दिला. बुमराहने व्हेरेनेला सीराज करवी झेलबाद केले. व्हेरेने याने ७ चेंडूत ९ धावा केल्या.
याआधी सामन्याच्या पहिल्या दिवशी आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांत गारद झाला. त्यानंतर भारतीय संघ 153 धावांवर ऑलआऊट झाला. यानंतर भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाची धावसंख्या 3 बाद 62 अशी हाेती. ( IND vs SA 2nd Test Day 2)
पहिल्याच दिवशी तब्बल 23 विकेट
पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकन संघाचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अचूक मारा करत सहा विकेट घेतल्या. त्याच्यासह मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सावध सुरूवात केली. यानंतर रोहित शर्मा 39 धावा करून बाद झाला. तर विराटने सर्वाधिक 46 तर गिलने 36 धावांचे योगदान दिले. यांच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज 10 हून अधिक धावा करू शकला नाही. यामुळे आफिकन संघाने भारताला 153 धावांवर सर्वबाद केले. ( IND vs SA 2nd Test Day 2)
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 बाद 62 अशी झाली. एडन मार्कराम 36 आणि डेव्हिड बेडिंगहॅम सात धावांसह खेळत आहे. भारताकडे अजूनही 36 धावांची आघाडी असून दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात सात विकेट शिल्लक आहेत. दुसऱ्या डावात भारताकडून मुकेश कुमारने दोन आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. डीन एल्गर 12 धावा करून बाद झाला. टोनी जॉर्जी आणि ट्रिस्टन स्टब्स प्रत्येकी एक धाव काढून बाद झाले.
भारताने शेवटच्या सहा विकेट्स एकही धाव न करता गमावल्या. एकवेळ भारताची धावसंख्या 4 बाद 153 होती. विराट कोहली आणि लोकेश राहुल फलंदाजी करत होते. मात्र, राहुल बाद झाल्यानंतर शेवटच्या फळीतील फलंदाजांनी मैदानावर केवळ हजेरी लावली आणि ते माघारी परतले. भारताचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कर्णधार रोहितने 39 धावांची खेळी खेळली. शुभमन गिलने 36 आणि विराट कोहलीने सर्वाधिक 46 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त फक्त लोकेश राहुलला खाते उघडता आले. त्याने आठ धावा केल्या.
भारताने 11 चेंडूत 6 विकेट गमावल्या
भारताने शेवटच्या 6 विकेट एकही धाव न करता गमावल्या. 153 च्या स्कोअरवर टीमने 4 विकेट गमावल्या होत्या, या स्कोअरवर टीम ऑलआऊट झाली होती. 34व्या षटकातील पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर संघाने विकेट गमावल्या. त्यानंतर 35व्या षटकातही भारताने दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट गमावल्या. लुंगी एनगिडीने 34व्या षटकात तीन, तर कागिसो रबाडाने 35व्या षटकात 2 बळी घेण्याची किमया केली. यामध्ये यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार (नाबाद) यांना खाते उघडता आले नाही.
On Day 1 of the Cape Town Test, 23 wickets fell on this pitch. Your prediction for today? 🤔 #SAvIND pic.twitter.com/o3cC2JBOvp
— BCCI (@BCCI) January 4, 2024
हेही वाचा :
Divya Pahuja murder | गँगस्टरची गर्लफ्रेंड, एन्काउंटर आणि बदला, मॉडेल दिव्या पाहुजाची मर्डर मिस्ट्री चर्चेत
Jitendra Awhad On Rohit Pawar: रोहित पवार अजून लहान, मी त्यांना महत्त्व देत नाही : जितेंद्र आव्हाड
Pune News : शहरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
The post दक्षिण आफ्रिकेला नववा धक्का; रबाडा बाद appeared first on Bharat Live News Media.