Pune : होळकर चौकात चुकीचा फलक

मंचर/लोणी धामणी : Bharat Live News Media वृत्तसेवा : पारगाव (ता. आंबेगाव) गावाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात आलेला दिशादर्शक फलक हा चुकीचा आहे. या फलकावर मंचर आणि निरगुडसर गावाकडे दिशा दाखविणारा बाण चुकीचा टाकण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालक पाबळ, लोणी धामणी, जारकवाडीकडे जात असून, त्यांची फसगत होत आहे. हा फलक तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थांनी केली आहे. ओझर-रांजणगाव या अष्टविनायक महामार्गाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे.
या महामार्गावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या महामार्गावर पारगाव (ता. आंबेगाव) गावाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गावांची दिशा दाखविणारा फलक उभारण्यात आला आहे. या फलकावर मंचर, निरगुडसरकडे जो दिशादर्शक बाण टाकला आहे तो रस्ता पाबळ, लोणी धामणी, जारकवाडी या गावांकडे जाणारा आहे. त्यामुळे या चुकीच्या दिशादर्शक फलकामुळे बाहेरील नागरिक, वाहनचालकांची दिशाभूल होत त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हा चुकीचा दिशादर्शक फलक दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थांकडून होत आहे.
Latest Marathi News Pune : होळकर चौकात चुकीचा फलक Brought to You By : Bharat Live News Media.
