आयटी कंपनीत तरुणीशी अश्लील कृत्य; एकावर गुन्हा दाखल

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : औंध भागातील एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करणार्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी कंपनीतील अधिकार्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने
दिलेल्या फिर्यादीनुसार, रतनेश डांगी (वय 45, रा. पंचशील टॉवर्स, खराडी) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आयटीआय रोड औंध येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ओैंध भागातील एका आयटी कंपनीत एचआर म्हणून काम करते, तर आरोपी रतनेश हा उच्चपदस्त अधिकारी आहे. रतनेश गेल्या सहा महिन्यांपासून तरुणीचा कामावरून सुटल्यानंतर पाठलाग करीत होता. कामाच्या बहाण्याने तो तिला केबिनमध्ये बोलावून घेऊन त्रास द्यायचा. त्यानंतर त्याने तरुणीला पगार दुप्पट करण्याचे आमिष दाखविले. तिला केबिनमध्ये बोलावून अश्लील कृत्य केले. त्याच्या त्रासामुळे तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक सुजाता शानमे तपास करीत आहेत.
हेही वाचा
Pimpri News : म्युन्सिपल बॉण्डनंतर आता ग्रीन बॉण्ड !
Crime News : गावठी पिस्तूल बाळगणारे तिघे जेरबंद
जालना : पिस्टल, चाकूचा धाक दाखवून अडीच लाखांची रोकड लुटली
Latest Marathi News आयटी कंपनीत तरुणीशी अश्लील कृत्य; एकावर गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.
