गँगस्टरची गर्लफ्रेंड, एन्काउंटर आणि बदला, मॉडेल दिव्या पाहुजाची मर्डर मिस्ट्री चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणातील गुरुग्राम येथील एका हॉटेलात २ जानेवारी रोजीच्या रात्री २७ वर्षीय मॉडेल दिव्या पाहुजा (Divya Pahuja) हिची हत्या झाली होती. पोलिसांनी या हत्या प्रकरणी आतापर्यंत ३ संशयितांना अटक केली आहे. यात हॉटेल मालक अभिजित सिंह आणि हॉटेलमध्ये काम करणाऱ्या हेमराज आणि ओमप्रकाश याचा समावेश आहे. या हत्या प्रकरणाच्या चौकशीत अनेक मोठे … The post गँगस्टरची गर्लफ्रेंड, एन्काउंटर आणि बदला, मॉडेल दिव्या पाहुजाची मर्डर मिस्ट्री चर्चेत appeared first on पुढारी.

गँगस्टरची गर्लफ्रेंड, एन्काउंटर आणि बदला, मॉडेल दिव्या पाहुजाची मर्डर मिस्ट्री चर्चेत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हरियाणातील गुरुग्राम येथील एका हॉटेलात २ जानेवारी रोजीच्या रात्री २७ वर्षीय मॉडेल दिव्या पाहुजा (Divya Pahuja) हिची हत्या झाली होती. पोलिसांनी या हत्या प्रकरणी आतापर्यंत ३ संशयितांना अटक केली आहे. यात हॉटेल मालक अभिजित सिंह आणि हॉटेलमध्ये काम करणाऱ्या हेमराज आणि ओमप्रकाश याचा समावेश आहे. या हत्या प्रकरणाच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे समारे आले आहेत. यामुळे हे हत्या प्रकरण चर्चेत आले आहे. (Divya Pahuja murder)
मंगळवारी रात्री गुरुग्राममधील हॉटेलमध्ये हत्या करण्यात आलेल्या मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह पंजाबमधील नदीत फेकल्याचा पोलिसांना संशय आहे. गँगस्टर संदीप गाडोली (gangster Sandeep Gadoli) याच्या कथित ‘फेक’ एन्काउंटर प्रकरणी दिव्या पाहुजाला सात वर्षांची शिक्षा झाली होती. गाडोलीची गर्लफ्रेंड असलेल्या पाहुजाला गेल्या वर्षी जूनमध्ये जामीन मंजूर झाला होता. काही महिन्यांनंतर गेल्या मंगळवारी गुरुग्रामच्या एका हॉटेलमध्ये तिची हत्या करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेज आले समोर
दिव्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अभिजीत सिंह हा एका हॉटेलचा मालक आहे. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभिजीत सिंह आणि इतर ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला मृतदेह ओढून नेताना दिसून आले आहेत. संशयित अभिजीतने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, दिव्याच्या मोबाईलमध्ये त्याचे काही अश्लिल फोटो होते आणि त्या बदल्यात ती त्याला ब्लॅकमेल करत होती. ती त्याच्याकडून पैसेही घेत होती. अभिजीत पासवर्ड मागत होता आणि दिव्याने तो त्याला दिला नाही तेव्हा त्याने तिची गोळ्या झाडून हत्या केली. पोलीस तो मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
अभिजीतने चौकशीदरम्यान पुढे पोलिसांना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून ती जास्त पैसे मागत होती. २ जानेवारी रोजी तो दिव्याला घेऊन हॉटेलमध्ये पोहोचला. त्याने तिला फोटोज डिलीट करण्यासाठी सांगितले. त्याने पासवर्डही मागितला. पण तिने तो दिला नाही. यामुळे राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात दिव्यावर गोळी झाडली.
मृतदेह पंजाबमधील नदीत फेकल्याचा संशय
दरम्यान, हॉटेलमधून मिळवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभिजीत सिंह आणि इतर काहीजण ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला मृतदेह ओढताना दिसत आहे. या खून प्रकरणातील संशयित निळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारच्या डिग्गीतून दिव्याचा मृतदेह घेऊन जाताना दिसले आहेत. मात्र, अद्याप दिव्याचा मृतदेह मिळालेला नाही. दरम्यान, संशयित आरोपींनी मृतदेह पंजाबमधील नदीत फेकल्याचा पोलिसांना संशय आहे. (Divya Pahuja murder)
कोण आहे मॉडेल दिव्या पाहुजा?
मॉडेल दिव्या पाहुजा ही गुरुग्राम येथील बलदेव नगर येथील रहिवासी आहे. ती कधी काळी गँगस्टर संदीप गाडोली याची गर्लफ्रेंड होती. हरियाणा पोलिस संदीपचा शोध घेत होती. याचदरम्यान ७ फेब्रुवारी २०१६ रोजी हरियाणा पोलिसांना माहिती मिळाली की संदीप अंधेरी, मुंबईतील एका हॉटेलमध्ये आहे. त्यानंतर पोलिस तेथे पोहोचली आणि तेथे संदीपचा एन्काउंटर करण्यात आला. ज्यावेळी संदीपचा एन्काउंटर झाला त्यावेळी दिव्या मुंबईतील त्याच हॉटेलमध्ये होती. ती संदीप गाडोली एन्काउंटर प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. हरियाणा पोलिसांनी केलेल्या संदीप एन्काउंटर प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात दिव्याला साक्षीदार बनवले. यासोबतच दिव्यावर तिचा बॉयफ्रेंड म्हणजेच संदीप गाडोली विरुद्ध हरियाणा पोलिसांना माहिती दिल्याचा आरोप होता. या संपूर्ण प्रकरणात दिव्याच्या कुटुंबीयांनी गँगस्टर संदीप गाडोलीची बहीण सुदेश कटारिया आणि भाऊ ब्रह्मप्रकाश यांचा हात असल्याचा आरोप केला होता. दिव्याच्या कुटुंबीयांनी सुदेश आणि ब्रह्मप्रकाश यांच्या विरोधात हत्येचा कट रचल्याची तक्रारदेखील दाखल केली होती.
दिव्या पाहुजाच्या बहिणीने तक्रारीत म्हटले आहे की, २ जानेवारीच्या सकाळी आपण दिव्याशी बोललो. पण रात्री तिचा नंबर नॉट रिचेबल येऊ लागला. संशय आल्यावर मी हॉटेल मालक अभिजीतला फोन केला. पण तो काहीही सांगायला तयार नव्हता. यानंतर तिचा खून झाल्याची बातमी समोर आली.
Latest Marathi News गँगस्टरची गर्लफ्रेंड, एन्काउंटर आणि बदला, मॉडेल दिव्या पाहुजाची मर्डर मिस्ट्री चर्चेत Brought to You By : Bharat Live News Media.