परिते येथे प्रसादातून विषबाधा; रुग्णसंख्या आटोक्यात, रुग्णांना डिस्चार्ज

राशिवडे; पुढारी वृतसेवा : परिते (ता.करवीर) येथे विठ्ठल रुक्मिणी सप्ताहाच्या प्रसादातून विषबाधा झाल्याने ७० हून अधिक ग्रामस्थांना उलटी, जुलाबाचा त्रास झाला होता. त्यांना उपचारासाठी सीपीआर, राशिवडे बु, ठिकपुर्ली, इस्पुर्ली आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. यामधील दोन रुग्ण वगळता इतरांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून रुग्णसंख्या आटोक्यात आल्याची माहीती इस्पुर्ली आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.योगीता … The post परिते येथे प्रसादातून विषबाधा; रुग्णसंख्या आटोक्यात, रुग्णांना डिस्चार्ज appeared first on पुढारी.

परिते येथे प्रसादातून विषबाधा; रुग्णसंख्या आटोक्यात, रुग्णांना डिस्चार्ज

राशिवडे; Bharat Live News Media वृतसेवा : परिते (ता.करवीर) येथे विठ्ठल रुक्मिणी सप्ताहाच्या प्रसादातून विषबाधा झाल्याने ७० हून अधिक ग्रामस्थांना उलटी, जुलाबाचा त्रास झाला होता. त्यांना उपचारासाठी सीपीआर, राशिवडे बु, ठिकपुर्ली, इस्पुर्ली आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. यामधील दोन रुग्ण वगळता इतरांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून रुग्णसंख्या आटोक्यात आल्याची माहीती इस्पुर्ली आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.योगीता अग्रवाल-पाटील यांनी दिली.
बुधवारी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत आरोग्य विभागाने गावात तळ ठोकून रुग्णांची तपासणी केली. बाधीतांना सी.पी.आर, इस्पुर्ली, राशिवडे बु,ठिकपुर्ली आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज टप्प्याटप्प्याने रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. बाधितांची संख्या आटोक्यात आली असुन आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना तात्काळ उपचार मिळाले. तर सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, पो.पाटील यांच्यासह ग्रामस्थांनीही चांगली मदत केली.
हेही वाचा : 

‘आठ दिवसांत निर्णय न झाल्यास कारखाना गेटवर आंदोलन’
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत सरप्राईज उमेदवार असेल : आ. सतेज पाटील
कोल्हापूर : जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षकांना १५ हजारांची लाच घेताना अटक

 
Latest Marathi News परिते येथे प्रसादातून विषबाधा; रुग्णसंख्या आटोक्यात, रुग्णांना डिस्चार्ज Brought to You By : Bharat Live News Media.