बीड : गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धाड

गेवराई, Bharat Live News Media वृत्तसेवा : स्त्री जन्मदर कमी असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेवराईच्या संजय नगर भागात सोनोग्राफी सेंटरच्या माध्यमातून गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी धाड टाकली असता सोनोग्राफी मशीनसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एक जण फरार झाला आहे.
या ठिकाणाहून पोलिसांनी सोनोग्राफी मशीन तसेच गर्भपातासाठी लागणारे साहित्य व औषधे जप्त केली आहेत. आरोग्य विभाग, स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईने बीड जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्या सारखे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा :
बनावट पासद्वारे सिटीलिंकची होतेय फसवणूक
नंदुरबार पोलिसांकडून निराधारांना ‘माणुसकीची उब’
महापे एमआयडीसीत केमिकल कंपनीला आग
Latest Marathi News बीड : गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धाड Brought to You By : Bharat Live News Media.
