धक्कादायक ! नवजात बालकाचे आढळले शीर

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती सूर्यनगरी येथील निर्जन परिसरात नुकत्याच जन्माला एका बाळाचे फक्त मुंडकं शिल्लक राहिलेला मृतदेह आढळून आला आहे. या अत्यंत धक्कादायक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती एमआयडीसी परिसरात सूर्यनगरीमध्ये नागरिकांना या बाळाचे मुंडके आढळून आले आहे. त्यामुळे या बाळाचा घातपात झाला की कुत्र्यांनी या बाळाचा शरीराचा भाग खाऊन टाकला, किंवा अंधश्रद्धेचा प्रकार आहे याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. सध्या रुई ग्रामीण रुग्णालयात या जन्मजात बाळाचे शवविच्छेदन केले जात आहे. पोलिस तपासानंतरचे याबाबतचे सत्य पुढे येणार आहे.
हेही वाचा :
नाशिक-मुंबई महामार्गाचे काँक्रीटीकरण होणार, २० किमीसाठी निविदा प्रसिध्द
Weather Update: उत्तरेत गारठा, महाराष्ट्रासह दक्षिणेत अवकाळीची शक्यता
Latest Marathi News धक्कादायक ! नवजात बालकाचे आढळले शीर Brought to You By : Bharat Live News Media.
