मोठी बातमी! YSRTP पक्ष प्रमुख वायएस शर्मिला यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुढारी ऑनलाईन : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण आणि वायएसआर तेलंगणा पक्षाच्या (YSRTP) प्रमुख वायएस शर्मिला यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वायएस शर्मिला यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. (YS Sharmila joins Congress) वायएस शर्मिला यांनी काल इदुपुलापाया येथील भेटीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार … The post मोठी बातमी! YSRTP पक्ष प्रमुख वायएस शर्मिला यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश appeared first on पुढारी.

मोठी बातमी! YSRTP पक्ष प्रमुख वायएस शर्मिला यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Bharat Live News Media ऑनलाईन : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण आणि वायएसआर तेलंगणा पक्षाच्या (YSRTP) प्रमुख वायएस शर्मिला यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वायएस शर्मिला यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. (YS Sharmila joins Congress)
वायएस शर्मिला यांनी काल इदुपुलापाया येथील भेटीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार वायएस शर्मिला आज सकाळी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस समिती मुख्यालयात पोहोचल्या होत्या.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. यानंतर काही दिवसांतच वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुखांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
वायएस शर्मिला या वायएसआर तेलंगणा पक्षाच्या संस्थापक आणि अध्यक्षा देखील आहेत. तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवून भारत राष्ट्र समितीचे (BRS) वर्चस्व संपुष्टात आणले. यानंतर आता ही घडामोड समोर आली आहे.
तेलंगणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये वायएस शर्मिला यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना फायदा होऊ शकणाऱ्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी त्यांनी तेलंगणात निवडणूक लढविण्यासही नकार दिला होता. “मी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहे. कारण तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयाची संधी आहे,” असे त्यांनी म्हटले होते.
“केसीआर यांनी त्यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही आणि यामुळे केसीआर पुन्हा सत्तेत येऊ नयेत असे मला वाटते. मी वायएसआर यांची मुलगी या नात्याने काँग्रेसला पाठिंबा देत आहे.” असे वायएस शर्मिला (YS Sharmila) यांनी सांगितले होते. (YS Sharmila joins Congress)
त्यांनी पुढे दावा केला की तेलंगणातील ३१ जागांवर काँग्रेसचा विजय मुख्यत्वे त्यांच्या पक्षाने निवडणूक न लढविल्याने झाला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी वायएस शर्मिला यांना काँग्रेसमध्ये महत्त्वाचे पद दिले जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आंध्र प्रदेशच्या निवडणुकीतही शर्मिला यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. तेलंगणात काँग्रेसने प्रथमच ११९ पैकी ६४ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवले. भारत राष्ट्र समितीला ३८ जागांवर समाधान मानावे लागले.
शर्मिला ह्या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वायएस राजशेखर रेड्डी यांची कन्या आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या लहान बहीण आहेत.

#WATCH | YSRTP chief & Andhra Pradesh CM’s sister YS Sharmila joins Congress, in the presence of party president Mallikarjun Kharge and Rahul Gandhi, in Delhi pic.twitter.com/SrAr4TIZTC
— ANI (@ANI) January 4, 2024

Latest Marathi News मोठी बातमी! YSRTP पक्ष प्रमुख वायएस शर्मिला यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.