राज्यातील विद्यापीठांमध्ये आता भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित अभ्यासक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये 2024-25 शैक्षणिक वर्षापासून भारतीय ज्ञानपरंपरेवर (इंडियन नॉलेज सिस्टिम) आधारित सात अभ्यासक्रम सुरू होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे प्रधान सचिव के. संजय मूर्ती यांनी बुधवारी दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर असल्याचेही मूर्ती यांनी सांगितले. मूर्ती यांच्यासह केंद्र आणि राज्य … The post राज्यातील विद्यापीठांमध्ये आता भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित अभ्यासक्रम appeared first on पुढारी.

राज्यातील विद्यापीठांमध्ये आता भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित अभ्यासक्रम

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये 2024-25 शैक्षणिक वर्षापासून भारतीय ज्ञानपरंपरेवर (इंडियन नॉलेज सिस्टिम) आधारित सात अभ्यासक्रम सुरू होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे प्रधान सचिव के. संजय मूर्ती यांनी बुधवारी दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर असल्याचेही मूर्ती यांनी सांगितले.
मूर्ती यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या शिक्षण विभागातील उच्च पदस्थ अधिकार्‍यांनी डेक्कन कॉलेज विद्यापीठाला बुधवारी भेट दिली. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत मूर्ती बोलत होते. इंडियन नॉलेज सिस्टिमवर आधारित सात अभ्यासक्रम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ अशा चार विद्यापीठांच्या पुढाकारातून तयार करण्यात आले आहे.
शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीचा मुख्य टप्पा म्हणून हे सात अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यास सुरुवात होणार आहे, असे मूर्ती यांनी सांगितले. इंडियन नॉलेज सिस्टिमवर आधारित अभ्यासक्रमांचा लाभ राज्यातील विद्यापीठांना घेता येण्यासाठी एक पोर्टल तयार करण्यात येत आहे. या पोर्टलच्या आधारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांविषयी माहिती मिळेल. त्याचप्रमाणे ते शिकताही येणार आहे, असे शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीच्या समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
आयओई दर्जा देणे सुरूच…
शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर ठरणार्‍या विद्यापीठांना इन्स्टिट्यूशन्स ऑफ एमिनन्सचा (आयओई) दर्जा देणे बंद करण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण मूर्ती यांनी दिले. डेक्कन कॉलेजचा इतिहास आणि कार्य हे एमिनन्सचा दर्जा देण्यापेक्षा कितीतरी मोठे आहे. अशा गुणवत्तापूर्ण विद्यापीठांना एमिनन्सच्या दर्जाची आवश्यकता काय, असे स्पष्टीकरण मूर्ती यांनी दिले.
हेही वाचा

नाशिक-मुंबई महामार्गाचे काँक्रीटीकरण होणार, २० किमीसाठी निविदा प्रसिध्द
आव्हाडांच्या वक्तव्यावर मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची प्रतिक्रिया
जागतिक ब्रेल लिपी दिन विशेष : दृष्टिहिनांच्या मार्गात भटक्या कुत्र्यांचा अडथळा

Latest Marathi News राज्यातील विद्यापीठांमध्ये आता भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित अभ्यासक्रम Brought to You By : Bharat Live News Media.