अमेरिकेत महिलेच्या पोटात दोन गर्भाशये, दोन बाळं!

न्यूयॉर्क : संपूर्ण जगाला आश्चर्यात पाडणारा एक प्रकार अमेरिकेतून समोर आला आहे. अलाबामा या राज्यात हॅचर नावाची महिला गर्भवती असून या महिलेच्या पोटात दोन गर्भ आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही गर्भ वेगवेगळ्या गर्भाशयात आहेत. या दोन्ही बाळांना अन्न पुरवण्यासाठी दोन वेगवेगळे प्लॅसेन्टा (नाळ) आहेत. त्यामुळे या महिलेच्या पोटात असलेल्या बाळांना जुळे म्हणावे की काय? असा … The post अमेरिकेत महिलेच्या पोटात दोन गर्भाशये, दोन बाळं! appeared first on पुढारी.

अमेरिकेत महिलेच्या पोटात दोन गर्भाशये, दोन बाळं!

न्यूयॉर्क : संपूर्ण जगाला आश्चर्यात पाडणारा एक प्रकार अमेरिकेतून समोर आला आहे. अलाबामा या राज्यात हॅचर नावाची महिला गर्भवती असून या महिलेच्या पोटात दोन गर्भ आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही गर्भ वेगवेगळ्या गर्भाशयात आहेत. या दोन्ही बाळांना अन्न पुरवण्यासाठी दोन वेगवेगळे प्लॅसेन्टा (नाळ) आहेत. त्यामुळे या महिलेच्या पोटात असलेल्या बाळांना जुळे म्हणावे की काय? असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. हॅचर सध्या 34 आठवड्यांच्या गरोदर आहेत.
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी त्या प्रसूत होणार आहेत. हॅचर यांनी या आगळ्यावेगळ्या गर्भधारणेबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ‘ही बाब समजली तेव्हा मला आश्चर्य वाटले. मी माझ्या पतीला याबाबत सांगितले. माझ्या पतीलादेखील यावर विश्वास बसला नव्हता. माझ्या पोटात दोन अर्भकं दोन वेगवेगळ्या गर्भाशयात आहेत, हे समजल्यावर याआधी एखाद्या महिलेची माझ्याप्रमाणेच स्थिती राहिलेली आहे का? हे शोधण्याचा मी प्रयत्न केला. मला त्यांचा अनुभव जाणून घ्यायचा होता. मात्र, संपूर्ण जगात माझ्याप्रमाणे फक्त दोन महिलांचीच प्रसूती झाल्याचे मला समजले. या दोन्ही महिलांशी माझा संपर्क होऊ शकला नाही’, असे हॅचर यांनी सांगितले. हॅचर यांना दोन गर्भाशये आहेत.
वयाच्या 17 व्या वर्षी त्यांना ही बाब समजली. हॅचर यांना याआधी तीनवेळा गर्भधारणा झालेली असून त्यांना तीन मुले आहेत. या तिन्ही वेळा एखाद्या सामान्य महिलेप्रमाणेच त्यांना गर्भधारणा झालेली होती. यावेळी मात्र त्यांच्या पोटात दोन अर्भकं असून ती दोन्ही वेगवेगळ्या गर्भाशयात आहेत. त्यांची दोन मुलं प्रत्येकी सात, चार वर्षांची असून तिसरे मूल 23 महिन्यांचे आहे. चौथ्यांदा गरोदर राहिल्यानंतर हॅचर यांनी आठव्या आठवड्यात सोनोग्राफी केली, यावेळी त्यांच्या पोटात दोन अर्भकं असल्याचे डॉक्टरांना समजले. दरम्यान, हॅचर यांची प्रसूती त्यांच्या प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकते, असे म्हटले जात आहे. या जगात एका टक्क्यापेक्षाही कमी महिलांना दोन गर्भाशय असतात.
The post अमेरिकेत महिलेच्या पोटात दोन गर्भाशये, दोन बाळं! appeared first on पुढारी.

न्यूयॉर्क : संपूर्ण जगाला आश्चर्यात पाडणारा एक प्रकार अमेरिकेतून समोर आला आहे. अलाबामा या राज्यात हॅचर नावाची महिला गर्भवती असून या महिलेच्या पोटात दोन गर्भ आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही गर्भ वेगवेगळ्या गर्भाशयात आहेत. या दोन्ही बाळांना अन्न पुरवण्यासाठी दोन वेगवेगळे प्लॅसेन्टा (नाळ) आहेत. त्यामुळे या महिलेच्या पोटात असलेल्या बाळांना जुळे म्हणावे की काय? असा …

The post अमेरिकेत महिलेच्या पोटात दोन गर्भाशये, दोन बाळं! appeared first on पुढारी.

Go to Source