शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, सेन्सेक्स ३७५ अंकांनी वाढला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज गुरुवारी (दि.४) शेअर बाजारात तेजी परतली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३७५ अंकांनी वाढून ७१,७३१ वर गेला. तर निफ्टी ८६ अंकांच्या वाढीसह २१,६०० पार झाला. आजच्या बाजारातील तेजीत बँकिंग, वित्तीय आणि आयटी शेअर्स आघाडीवर आहेत.
अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह नेमकी कधी व्याजदरात कपात करणार? याबद्दल गुंतवणूकदार चिंतेत आहेत. यामुळे जागतिक संकेत नकारात्मक असतानाही भारतीय शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली आहे.
Latest Marathi News शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, सेन्सेक्स ३७५ अंकांनी वाढला Brought to You By : Bharat Live News Media.
