दूरचित्रवाणी प्रक्षेपणाला दिशा देणारे मधुकर थोते यांचे निधन

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : दूरचित्रवाणी क्षेत्रात अनेक वर्षे कार्य करणारे मधुकर यादव थोते (वय 93) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. भारतात रंगीत दूरचित्रवाणी (टीव्ही) प्रसारणात मधुकर थोते यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. दूरचित्रवाणी प्रसारण कृष्णधवलमध्ये (ब्लॅक अँड व्हाईट) असताना 1980 साली दिल्ली दूरदर्शनचे प्रभारी अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.
त्यानंतर त्यांनी कलर ट्रान्समिशन तंत्रज्ञानावर आपले काम सुरू केले. दोन वर्षांच्या संशोधन, प्रयोग आणि चाचण्यांनंतर भारतामध्ये 1982 साली थोते यांच्या सक्षम तांत्रिक नेतृत्वाखाली रंगीत दूरचित्रवाणी प्रसारणाचे युग सुरू झाले. या योगदानाव्यतिरिक्त थोते यांनी देशभरात आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी प्रसारण केंद्रे उभारण्यात मोलाचा वाटा उचलला.
1976 ते 1978 सालादरम्यान फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मध्ये संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. 1979 मध्ये आफि—केतील दूरसंचार संस्थेच्या स्थापनेसाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने प्रकल्प संचालक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. 1988 साली दूरदर्शन आणि आकाशवाणीचे मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 22 वर्षे एज्युकेशनल मल्टीमीडिया रिसर्च सेंटर आणि मीडिया व कम्युनिकेशन स्टडीज विभागाचे संचालक म्हणून काम पाहिले. ते इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियंता संस्थेच्या पुणे विभागाचे (आयईटीई) अध्यक्षदेखील होते.
हेही वाचा
..त्यांना घरी जाऊन उमेदवारी देऊ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
विद्यापीठात भ्रष्टाचाराबाबत आरोप तथ्यहीन : विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल होणार
Latest Marathi News दूरचित्रवाणी प्रक्षेपणाला दिशा देणारे मधुकर थोते यांचे निधन Brought to You By : Bharat Live News Media.
