‘श्रीराम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते’ : जितेंद्र आव्हाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : “भगवान श्री राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. १४ वर्षांपासून जंगलात राहणारा माणूस शाकाहारी अन्न शोधायला कुठे जाणार? बरोबर आहे की नाही?” असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. शिर्डी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण … The post ‘श्रीराम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते’ : जितेंद्र आव्हाड appeared first on पुढारी.
‘श्रीराम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते’ : जितेंद्र आव्हाड

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : “भगवान श्री राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. १४ वर्षांपासून जंगलात राहणारा माणूस शाकाहारी अन्न शोधायला कुठे जाणार? बरोबर आहे की नाही?” असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. शिर्डी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

NCP-Sharad Pawar faction leader, Dr.Jitendra Awhad at an event in Maharashtra’s Shirdi yesterday said, “Lord Ram was not a vegetarian, he was a non-vegetarian. Where would a person living in the forest for 14 years go to find vegetarian food? Is it correct or not (question to the… pic.twitter.com/xxUdxB4yoe
— ANI (@ANI) January 4, 2024

आव्हाड यांच्या घराबाहेर अजित पवार गटाचे आंदोलन
ठाणे : आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर आरती करून त्यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे युवा शहर अध्यक्ष वीरू वाघमारे यांच्यासह काही जणांनी आव्हाड यांच्या घराबाहेर जाऊन आरती करण्याचा प्रयत्न करत त्यांचा निषेध केला. त्यामुळे तातडीने वर्तकनगर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. त्यांना सोडविण्यासाठी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या आंदोलनानंतर आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Latest Marathi News ‘श्रीराम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते’ : जितेंद्र आव्हाड Brought to You By : Bharat Live News Media.