Pune Crime News : पंधरा वर्षांच्या मुलीचा वडिलांकडून खून; कुर्‍हाडीने वार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाघोली परिसरात राहत असलेल्या एका कुटुंबातील वडिलांनी स्वत:च्या 15 वर्षीय मुलीवर कुर्‍हाडीने वार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे लोणीकंद पोलिसांनी सांगितले. पित्याने केलेल्या हल्ल्यानंतर मुलीला तत्काळ रुग्णालयात हलविले होते. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अक्षदा … The post Pune Crime News : पंधरा वर्षांच्या मुलीचा वडिलांकडून खून; कुर्‍हाडीने वार appeared first on पुढारी.

Pune Crime News : पंधरा वर्षांच्या मुलीचा वडिलांकडून खून; कुर्‍हाडीने वार

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : वाघोली परिसरात राहत असलेल्या एका कुटुंबातील वडिलांनी स्वत:च्या 15 वर्षीय मुलीवर कुर्‍हाडीने वार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे लोणीकंद पोलिसांनी सांगितले. पित्याने केलेल्या हल्ल्यानंतर मुलीला तत्काळ रुग्णालयात हलविले होते. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अक्षदा फकिरा दुपारगुडे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी फकिरा दुपारगुडे (मु. रा. सोलापूर) या आरोपीचा शोध सुरू केला असून, लोणीकंद पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पीडित 15 वर्षीय मुलगी तिचे वाघोली येथील राहते घरी होती. तिचे वडील सेंट्रिंग लेबरचे काम करतात तर आई धुणीभांडे करते. वडील फकिरा दुपारगुडे यांनी घरातील धारदार कुर्‍हाडीने मुलीवर डोक्यात, हातावर, पायावर वार करीत तिला गंभीर जखमी केले.
रक्ताच्या थारोळ्यात मुलगी खाली पडल्यावर आरोपीने हल्ला करणे थांबविले व तो पसार झाला होता. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच, पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीस तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना दिली होती. उपचारांदरम्यानच दुपारी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी जखमी पीडित मुलीच्या मावशीच्या पतीच्या तक्रारीवरून लोणीकंद पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली होती. त्याला लोणीकंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पित्यानेच आपल्या पंधरा वर्षांच्या मुलीवर हल्ला केल्याची घटना घडली होती. आम्हाला याबाबत माहिती समजल्यानंतर घटनास्थळी पोहोचून मुलीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गंभीर जखमी झाल्याने उपचारांदरम्यानच तिचा मृत्यू झाला.
विश्वजित काइंगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे

हेही वाचा

Weather Update : थंडी घटली; किमान तापमानात किंचित वाढ
‘आप’ विरुद्ध काँग्रेस
85 वा वर्धापनदिन स्नेहमेळा : दै.‘Bharat Live News Media’ला शुभेच्छा देण्यासाठी लोटला जनसागर

Latest Marathi News Pune Crime News : पंधरा वर्षांच्या मुलीचा वडिलांकडून खून; कुर्‍हाडीने वार Brought to You By : Bharat Live News Media.