Weather Update : थंडी घटली; किमान तापमानात किंचित वाढ

पुणे : राज्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात बुधवारी 2 ते 3 अंशांनी वाढ झाल्याने बहुतांश भागांतून थंडी गायब झाली होती. असे वातावरण 5 जानेवारीपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागांत बुधवारी ढगांनी गर्दी केल्याने किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाल्याने गारठा कमी झाला. कार्यालयांतील पंखे सुरू करावे लागले, असेच … The post Weather Update : थंडी घटली; किमान तापमानात किंचित वाढ appeared first on पुढारी.

Weather Update : थंडी घटली; किमान तापमानात किंचित वाढ

पुणे : राज्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात बुधवारी 2 ते 3 अंशांनी वाढ झाल्याने बहुतांश भागांतून थंडी गायब झाली होती. असे वातावरण 5 जानेवारीपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागांत बुधवारी ढगांनी गर्दी केल्याने किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाल्याने गारठा कमी झाला.
कार्यालयांतील पंखे सुरू करावे लागले, असेच वातावरण तयार झाले होते. अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याचा परिणाम राज्यात 6 जानेवारीपासून दिसेल. दरम्यान, 6 ते 8 जानेवारीमध्ये कोकण, तर मध्य महाराष्ट्रात 4 ते 8 जानेवारीदरम्यान हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे; तर मराठवाडा व विदर्भात अगदी तुरळक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारपासून राज्यात ढगांची गर्दी होण्यास सुरुवात झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे.
हेही वाचा

‘आप’ विरुद्ध काँग्रेस
केजरीवाल भीतीने कापत आहेत; भाजपची टीका
बेळगाव : लग्न मंडपात वधुपित्याच्या हातात पडली चिठ्ठी..अन् वर निघाला एचआयव्हीबाधित

Latest Marathi News Weather Update : थंडी घटली; किमान तापमानात किंचित वाढ Brought to You By : Bharat Live News Media.