एका सेकंदात दीडशे चित्रपट डाऊनलोड करणारे इंटरनेट

बीजिंग : Fast internet launchअवघ्या एका सेकंदात 150 चित्रपट डाऊनलोड करता येऊ शकतील असे म्हटल्यावर आपल्या भुवया नक्कीच उंचावतील. मात्र, आता हे वास्तव बनले असून जगातील सगळ्यात वेगवान इंटरनेट लाँच करण्यात आले आहे. एका चिनी कंपनीने जगातील सर्वांत वेगवान इंटरनेट नेटवर्कचे अनावरण केले आहे आणि असा दावा केला आहे की, प्रतिसेकंद 1.2 (टेराबिट) वेगात डेटा … The post एका सेकंदात दीडशे चित्रपट डाऊनलोड करणारे इंटरनेट appeared first on पुढारी.

एका सेकंदात दीडशे चित्रपट डाऊनलोड करणारे इंटरनेट

बीजिंग : Fast internet launchअवघ्या एका सेकंदात 150 चित्रपट डाऊनलोड करता येऊ शकतील असे म्हटल्यावर आपल्या भुवया नक्कीच उंचावतील. मात्र, आता हे वास्तव बनले असून जगातील सगळ्यात वेगवान इंटरनेट लाँच करण्यात आले आहे. एका चिनी कंपनीने जगातील सर्वांत वेगवान इंटरनेट नेटवर्कचे अनावरण केले आहे आणि असा दावा केला आहे की, प्रतिसेकंद 1.2 (टेराबिट) वेगात डेटा प्रसारित करू शकते. तसेच हा वेग सध्याच्या प्रमुख इंटरनेट मार्गांपेक्षा 10 पट अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. सिंघुआ युनिव्हर्सिटी, चायना मोबाईल, हुआवेई टेक्नॉलॉजीज व सर्नेट कॉर्पोरेशन यांनी मिळून हा प्रकल्प तयार केला आहे.
तीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेले हे नेटवर्क चीनच्या बीजिंग, वुहान व ग्वांगझूला एका विस्तृत ऑप्टिकल फायबर केबलिंग प्रणालीद्वारे जोडते Fast internet launch आणि 1.2 टेराबिट म्हणजेच 1200 गिगाबिटस् प्रतिसेकंद या वेगाने डेटा प्रसारित करण्याची क्षमता या वेगवान इंटरनेटमध्ये आहे. जगातील बहुतेक इंटरनेट बॅकबोन नेटवर्क फक्त 100 गिगाबिटस् प्रतिसेकंद वेगाने कार्य करतात. विशेष म्हणजे बीजिंग, वुहान, गुआंगझू कनेक्शन चीनच्या भविष्यातील इंटरनेट तंत्रज्ञान पायाभूत सुविधांचा एक भाग आहे.
Fast internet launch एक दशकभर चाललेला उपक्रम व राष्ट्रीय चायना एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क सर्नेटची पुनरावृत्ती आहे. हे नेटवर्क जुलैमध्ये अ‍ॅक्टिव्ह झाले आणि सोमवारी अधिकृतपणे ते लाँच केले गेले. नेटवर्कने सर्व ऑपरेशनल चाचण्यांना मागे टाकले आणि उत्तम कामगिरी केली. नेटवर्क खरेच वेगवान आहे का हे हुवाई टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष वांग लेई यांनी स्पष्ट केले की, हे वेगवान इंटरनेट फक्त एका सेकंदात 150 हाय डेफिनिशन चित्रपटांचा डेटा ट्रान्सफर करण्यास सक्षम आहे.
Fast internet launch दरम्यान, चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधील एफआयटीआय प्रकल्पाचे नेते वू जियानपिंग म्हणाले की, सुपरफास्ट लाईन ही फक्त एक यशस्वी ऑपरेशन नाही, तर चीनला अधिक वेगवान इंटरनेट तयार करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानदेखील देते आहे. सिंघुआ युनिव्हर्सिटीचे एक्सयू मिंगवेई यांनी वेगवान इंटरनेट बॅकबोनची सुपरफास्ट ट्रेन ट्रॅकशी तुलना करून स्पष्ट केले की, हे वेगवान इंटरनेट समान प्रमाणात डेटा वाहून नेण्यासाठी 10 नियमित ट्रॅक बदलते आणि परिणामी अधिक किफायतशीर व व्यवस्थापित प्रणाली बनते. तसेच या सिस्टीमचे सर्व सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर देशांतर्गत तयार केले गेले आहेत, असे सांगण्यात येत आहे.
The post एका सेकंदात दीडशे चित्रपट डाऊनलोड करणारे इंटरनेट appeared first on पुढारी.

बीजिंग : Fast internet launchअवघ्या एका सेकंदात 150 चित्रपट डाऊनलोड करता येऊ शकतील असे म्हटल्यावर आपल्या भुवया नक्कीच उंचावतील. मात्र, आता हे वास्तव बनले असून जगातील सगळ्यात वेगवान इंटरनेट लाँच करण्यात आले आहे. एका चिनी कंपनीने जगातील सर्वांत वेगवान इंटरनेट नेटवर्कचे अनावरण केले आहे आणि असा दावा केला आहे की, प्रतिसेकंद 1.2 (टेराबिट) वेगात डेटा …

The post एका सेकंदात दीडशे चित्रपट डाऊनलोड करणारे इंटरनेट appeared first on पुढारी.

Go to Source