छत्रपती संभाजीनगर : गांधीनगरमध्ये अपघातावरून तणाव; मारहाणीत चौघे जखमी
संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कारने दुचाकीसह महिला व मुलांना धडक दिल्याने संतप्त जमावाने कारमधील तरुणांना बेदम मारहाण केली. दगडफेक करून कार फोडली. यात चौघेही गंभीर जखमी झाले. दगडफेकीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी परिसरात तगडा फौजफाटा तैनात केला. गांधीनगरमधील हनुमान गल्ली परिसरात बुधवारी (दि. ३) रात्री १० वाजता ही घटना घडली.
शेख इस्माइल शेख इब्राहीम (रा. अल्तमश कॉलनी), वसीम (रा. हुसेन कॉलनी), सय्यद इम्रान सय्यद नसीम आणि अबुझर सय्यद मुमताज अली (रा. बायजीपुरा) या जखमींची घाटीत नोंद आहे. हे चारही तरुण कार घेऊन गांधीनगरमधून जात होते. त्यांनी एका दुचाकीला कट मारला. त्यानंतर तीन ते चार महिलांना धडक दिली. या अपघातानंतर संतप्त जमावाने दगडफेक करीत कारची तोडफोड केली. व कारमधील चौघांना बेदम मारहाण केली. हे चौघेही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. अपघातानंतर गांधीनगरमध्ये राडा झाल्याची माहिती मिळताच उपायुक्त नितीन बगाटे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे, क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक विकास खटके, छावणी ठाण्यातील उपनिरीक्षक गणेश केदार हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर परिसरात दंगा काबू पथक तैनात करण्यात आले.
हेही वाचा :
कोल्हापूर : आजऱ्याजवळील भीषण अपघातात गवंडी कामगार ठार
Crime News : निपाणी जळगावात आढळला मानवी हाताचा पंजा अन् हाड
UP Murder : उत्तर प्रदेशामध्ये ‘ऑनर किलिंग’, वडिलांकडून मुलीसह प्रियकराची हत्या
Latest Marathi News छत्रपती संभाजीनगर : गांधीनगरमध्ये अपघातावरून तणाव; मारहाणीत चौघे जखमी Brought to You By : Bharat Live News Media.