बच्चू कडू यांनी आघाडी धर्म पाळून नवनीत राणांना पाठिंबा द्यावा : रवी राणा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : आमदार बच्चू कडू यांनी आघाडी धर्म पाळावा आणि लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांना पाठिंबा द्यावा, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी व्यक्त केली आहे. खासदार नवनीत राणा प्रहारच्या तिकीटावर लढल्या तर हरकत नाही, या बच्चू कडू यांनी केलेल्या विधानावर आमदार रवी राणा ही प्रतिक्रिया दिली आहे. Ravi Rana सर्व पक्षीय … The post बच्चू कडू यांनी आघाडी धर्म पाळून नवनीत राणांना पाठिंबा द्यावा : रवी राणा appeared first on पुढारी.

बच्चू कडू यांनी आघाडी धर्म पाळून नवनीत राणांना पाठिंबा द्यावा : रवी राणा

अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा : आमदार बच्चू कडू यांनी आघाडी धर्म पाळावा आणि लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांना पाठिंबा द्यावा, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी व्यक्त केली आहे. खासदार नवनीत राणा प्रहारच्या तिकीटावर लढल्या तर हरकत नाही, या बच्चू कडू यांनी केलेल्या विधानावर आमदार रवी राणा ही प्रतिक्रिया दिली आहे. Ravi Rana
सर्व पक्षीय खासदार नवनीत राणा यांना समर्थन व पाठिंबा देत आहेत. तसेच अनेक पक्षांकडून लढण्याची ऑफरही मिळत आहे. मात्र, आम्ही महायुतीत असल्यामुळे आणि बच्चू कडू यांचा प्रहार देखील घटक पक्ष असल्यामुळे त्यांनीही लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना पाठिंबा द्यावा, असे राणा म्हणाले. दरम्यान कडू यांनी पाठिंबा दिल्यास त्यांना अचलपूर विधानसभा निवडणुकीत आम्हीही मदत करु, असे आश्वासनही आ.राणा यांनी दिले. Ravi Rana
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे मेळघाटचे एकमेव आमदार राजकुमार पटेल वेगळ्या वाटेवर असून त्यांना प्रहारच्या तिकिटावर विजयी होण्याची शाश्वती नसल्याचा दावाही राणा यांनी केला. भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी राजकुमार पटेल आग्रही असल्याचा दावा रवी राणा यांनी केला आहे. पटेल यांचा भाजपकडे कल आहे. बच्चू कडू यांनी आपले आमदार सांभाळले पाहिजेत, असे सांगत लोकसभा निवडणुकीत कडू यांनी राजकारण केले, तर त्याचे परिणाम देखील दिसतील, असा इशाराही राणा यांनी दिला.
हेही वाचा 

Maharashtra Politics : शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत कुठेही जाणार नाही : बच्चू कडू
आ. बच्चू कडू महाविकास आघाडीत जाणार? शरद पवारांचा मोठा खुलासा, म्हणाले…
मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे, आमदार बच्चू कडू यांची मागणी

Latest Marathi News बच्चू कडू यांनी आघाडी धर्म पाळून नवनीत राणांना पाठिंबा द्यावा : रवी राणा Brought to You By : Bharat Live News Media.