सिंधुदुर्ग : आंबोलीत धाराशिव, लातूरच्या पर्यटकांच्या गाडीचा भीषण अपघात; एकजण ठार, ६ जण जखमी

आंबोली, पुढारी वृत्तसेवा : धाराशिव – लातूर येथून गोवा येथे पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांच्या महेंद्रा थार गाडीचा आंबोलीतील नांगरतासवाडी येथे झाडावर आदळून भीषण अपघात झाला. यात गाडीतील एकाचा मृत्यू झाला. तर सहाजण जखमी झाले. ही घटना आज (दि.३) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. Sindhudurg News महादेव भगवान बांगर (वय ३२, रा. येरमळा, जि. धाराशीव), गणेश दिलीप साळुंखे … The post सिंधुदुर्ग : आंबोलीत धाराशिव, लातूरच्या पर्यटकांच्या गाडीचा भीषण अपघात; एकजण ठार, ६ जण जखमी appeared first on पुढारी.

सिंधुदुर्ग : आंबोलीत धाराशिव, लातूरच्या पर्यटकांच्या गाडीचा भीषण अपघात; एकजण ठार, ६ जण जखमी

आंबोली, Bharat Live News Media वृत्तसेवा : धाराशिव – लातूर येथून गोवा येथे पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांच्या महेंद्रा थार गाडीचा आंबोलीतील नांगरतासवाडी येथे झाडावर आदळून भीषण अपघात झाला. यात गाडीतील एकाचा मृत्यू झाला. तर सहाजण जखमी झाले. ही घटना आज (दि.३) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. Sindhudurg News
महादेव भगवान बांगर (वय ३२, रा. येरमळा, जि. धाराशीव), गणेश दिलीप साळुंखे (वय २२ रा. जामखंडे ता. अहमदनगर), बालाजी भगवान बांगर (वय ४०, रा. येरमळा, ता. कळंब, जि. धाराशीव), सुनिल कृष्णा कुलभैया (वय ३१, रा. शिरोळ, जि. बीड), नवनाथ विठोबा जाधव (वय ३९, रा. केज, जि. बीड), विष्णू अंकूश बांगर (वय २२, रा. येरमळा, जि. धाराशिव) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सावंतवाडी येथे कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले. Sindhudurg News
मंगळवारी (दि.२) हे पर्यटक लातूर – धाराशीव येथून गोवा येथे पर्यटनाला चालले होते. आज संध्याकाळी आंबोली मार्गे गोव्याला जात असताना येथील नांगरतासवाडी येथे मुख्य रस्त्यालगतच्या झाडावर त्यांची गाडी आदळली. भरधाव गाडीच्या धडकेत दोन झाडे उन्मळून पडली. गाडीच्या संपूर्ण दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. चालकाच्या बाजूस बसलेल्या दत्ता व्यंकट जाधव (वय ३५) याचा मृत्यू झाला.
सोबत असलेले सहा जण सुदैवाने बचावले. त्यातीत दोनजण गंभीर जखमी आहेत. इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळतातच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जगदीश दुधवाडकर, मनिष शिंदे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तसेच रात्री उशीरा पर्यंत अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही चालू होती. तर मृत दत्ता व्यंकट जाधव याचे नातेवाईक गुरुवारी आंबोलीत आल्यावर त्यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे.
अपघात झालेली नवी कोरी महिंद्रा थार नुकतीच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तीन – चार दिवसांपूर्वीच घेतली होती. त्यामुळे त्यांनी नववर्षानिमित्त गोव्यात पर्यटनाचा बेत आखला होता.
हेही वाचा 

सिंधुदुर्ग : भरधाव मोटार झाडाला धडकून अपघात; युवतीचा मृत्‍यू, २ जण जखमी
सिंधुदुर्ग : तुळस देऊळवाडी येथे भीषण आगीत घर जळून खाक
सिंधुदुर्ग : वातावरणातील बदलामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त

Latest Marathi News सिंधुदुर्ग : आंबोलीत धाराशिव, लातूरच्या पर्यटकांच्या गाडीचा भीषण अपघात; एकजण ठार, ६ जण जखमी Brought to You By : Bharat Live News Media.