इराणमध्ये माजी जनरल सुलेमानीच्या कबरीजवळ दोन स्फोट, 103 जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : Explosions in Iran : इराणमधील केरमन शहरात दोन भीषण स्फोट झाले असून यात तब्बल 103 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर 170 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. न्यूज एजन्सी एएफपीने ही माहिती दिली आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘2020 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेलेल्या सर्वोच्च कमांडर कासिम सुलेमानी … The post इराणमध्ये माजी जनरल सुलेमानीच्या कबरीजवळ दोन स्फोट, 103 जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.

इराणमध्ये माजी जनरल सुलेमानीच्या कबरीजवळ दोन स्फोट, 103 जणांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Explosions in Iran : इराणमधील केरमन शहरात दोन भीषण स्फोट झाले असून यात तब्बल 103 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर 170 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. न्यूज एजन्सी एएफपीने ही माहिती दिली आहे.
इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘2020 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेलेल्या सर्वोच्च कमांडर कासिम सुलेमानी यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात हे स्फोट झाले. सुलेमानी यांच्या हत्येच्या चौथ्या स्मृतीदिना नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान पहिला स्फोट हा कबरीजवळच झाला. त्यानंतर काहीवेळाने दुसरा स्फोट झाला. हे स्फोट कशामुळे झाले किंवा हा दहशतवादी हल्ला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.’
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनेक मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. अशातच स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये पळपळ सुरू केल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे काही वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. दरम्यान, हे स्फोट इस्रायलने घडवून आणल्याचा आरोप केरमन प्रांताचे खासदार हुसेन जलाली यांनी केला आहे.
माजी जनरल सुलेमानी यांचा मृत्यू कसा झाला?
3 जानेवारी 2020 रोजी बगदाद विमानतळावर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात माजी जनरल सुलेमानी मारले गेले. सुलेमानी हे इराणमधील शक्तिशाली व्यक्तिमत्त्व होते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्यानंतर ते देशातील दुसरे सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जात होते. ते इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या फॉरेन ऑपरेशन्स शाखेच्या कुड्स फोर्सचे ते कमांडर होते.
Latest Marathi News इराणमध्ये माजी जनरल सुलेमानीच्या कबरीजवळ दोन स्फोट, 103 जणांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.