कोल्हापूर : आजऱ्याजवळील भीषण अपघातात गवंडी कामगार ठार
आजरा: Bharat Live News Media वृत्तसेवा : आजरा -आंबोली मार्गावरील आजरा शहराजवळील पारेवाडी तिट्टा व मिनर्वा हॉटेलजवळ ट्रॅक्स आणि मोटरसायकलचा आज (दि.३) सायंकाळी साडेसहा वाजता भीषण अपघात झाला. यात गवंडी काम करणारा कामगार जागीच ठार झाला. दत्तात्रय बाळू गोवेकर (वय ४२, रा. हाळोली, ता आजरा) असे कामगाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवेकर हे कामावरून संध्याकाळी साडेसहा वाजता घरी जात होते. यावेळी पारेवाडी तिट्टयाजवळ आजरा एमआयडीसीमधून काजू कारखान्यात काम करणा-या महिलांना घेऊन आज-याकडे येणाऱ्या ट्रॅक्स येत होती. यावेळी गोवेकर यांचा मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने पाठीमागून येणा-या ट्रॅक्सखाली गोवेकर सापडले. यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात मोटरसायकलचा चक्काचूर झाला.
घटनास्थळी प्रवासी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी आजरा ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचा
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत सरप्राईज उमेदवार असेल : आ. सतेज पाटील
कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याच्या एमडींना मारहाण
कोल्हापूर : प्राणघातक हल्ल्यातील जखमी बेकरी व्यावसायिकाचा मृत्यू
Latest Marathi News कोल्हापूर : आजऱ्याजवळील भीषण अपघातात गवंडी कामगार ठार Brought to You By : Bharat Live News Media.